मोहम्मद शमीच्या पुनरागमनाला काही अर्थ नाही..’, या दिग्गजाच्या वक्तव्याने चर्चेला उधाण!
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmed Shami) टीम इंडियासाठी मागील सामना मार्च 2025 मध्ये खेळला होता. हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होता. त्यानंतर शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र, अद्याप त्याचे टीम इंडियात पुनरागमन झालेले नाही. अनेक दिग्गजांनी शमीला पुन्हा संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याच्या पुनरागमनाची चर्चा सुरू असतानाच टीम इंडियाचा माजी दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik on Mohmmed Shami) शमीला संघात परत आणण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे.
कार्तिकच्या मते, भारतीय संघ शमीच्या पुढे निघून गेला आहे. त्यामुळे आता इतर गोलंदाजांकडे पाहायला हवे. शमी चांगली कामगिरी करत असला, तरी त्याला पुन्हा संघात घेण्याचे कारण नाही, असेही कार्तिकने म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, मला वाटते की संघात आणखीही गोलंदाज आहेत. भारत शमीच्या पुढे निघून गेला आहे. पुन्हा मागे जाण्यात काही अर्थ नाही. शमीने शानदार गोलंदाजी केली असली, तरी मी त्याच्याकडे पाहत नाही.
एकीकडे कार्तिकने शमीच्या पुनरागमनाला समर्थन दिले नाही. मात्र, विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी खेळत राहायला हवे, असे त्याने म्हटले आहे. कार्तिक म्हणाला, “होय, ही दोन सर्वात मोठी नावे आहेत आणि भारत हा जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे जर आपण या दोन सर्वोत्तम क्रिकेटपटूंना गमावले, तर त्याचा परिणाम नक्कीच होईल.
अलीकडे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात किंग कोहलीने नाबाद 139 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 29 धावा केल्या. मात्र, तिसऱ्या वनडे सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
‘हिटमॅन’ रोहित शर्माही वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला. रोहितसाठी ही मालिका शानदार ठरली. त्याने एका शतकासह एका अर्धशतकाची खेळी करत तीन सामन्यांत 32, 101 आणि 92 धावा केल्या.
Comments are closed.