IND vs WI: भारत-वेस्टइंडिज दोन्ही संघात उद्यापासून टी20 मालिकेला सुरुवात! वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही?

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (Team india vs west indies) दोन्ही संघात 5 टी20 सामन्यांची मालिका उद्यापासून खेळली जाणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी असा प्रश्न उपस्थित होत आहे की, यामध्ये वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का?

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 वर्षांच्या वयात एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. हे सांघिक पदक असले, तरी सुवर्णपदक हे सुवर्णपदकच असते. आता भारतीय संघ एशियन गेम्समधून परतला असून, त्यांचा पुढील सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. मात्र, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वैभवला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. एशियन गेम्समध्येही (Asian Games) त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र त्यात त्याला म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नाही.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयने (BCCI) आधीच केली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना होईल, तेव्हा अभिषेक शर्मा (Abhishek Sharma & Sanju Samson) आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर ईशान किशन (Ishaan kishan & Shreyas Iyer) आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांचा क्रमांक असेल. तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल यांचे खेळणेही जवळपास निश्चित दिसत आहे. त्यामुळे वैभवला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

एशियन गेम्समधील दोन सामन्यांत वैभवने अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात केली होती. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र, या सामन्यांमध्ये ना वैभवला मोठ्या धावा करता आल्या, ना संजूलाही विशेष कामगिरी करता आली. त्यामुळे संजूला पुन्हा एकदा सलामीला पाठवले जाऊ शकते.

एशियन गेम्समध्ये वैभव सूर्यवंशीला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला पुन्हा एकदा प्रभाव पाडण्यात यश आले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 38 धावांची छोटी मात्र आक्रमक खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभव केवळ 15 धावा करून बाद झाला. वैभवने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली, मात्र त्याला आपली खेळी मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करता आली नाही. त्यामुळे आगामी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळणे कठीण दिसत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

Comments are closed.