एमपीएससीच्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्च 2026 च्या गट ब च्या परीक्षेचा पेपर लीक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने एमपीएससीच्या आणखी एका सहाय्यक कक्ष अधिकाऱयाला आज अटक केली. रोहित कोलटक्के असे त्याचे नाव असून या प्रकरणातील ही तेरावी अटक आहे. एमपीएससीने तयार केलेल्या प्रश्नसंचातील शेकडो प्रश्न घेऊन तो प्रश्नसंच ऋतुजा पाटील हिला देण्यात आला होता. ऋतुजाचे वडील व राज्य शासनाचा आदर्श पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अमृत पाटील यांना कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी आणून दिला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यासह इतर मध्यस्त अमृत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव पाटील, संदीप खलाटे व भैरवनाथ कदम यांनाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

Comments are closed.