आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस, राज्यभरात सामाजिक उपक्रम
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उद्या असून यानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्या दुपारी 12.30 ते 4 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिक, युवासैनिक मोठय़ा उत्साहात साजरा करतात. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागते. आदित्य ठाकरेदेखील शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा मोठय़ा आदराने स्वीकार करीत आभार मानतात. या वर्षीदेखील आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक मोठय़ा संख्येने ‘मातोश्री’वर येणार आहेत. त्याचवेळी मुंबईसह राज्यभरात सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
Comments are closed.