स्टीव्ह स्मिथच्या 11000 कसोटी धावा पूर्ण! राहुल द्रविडला टाकले मागे, सचिन तेंडुलकर थोडक्यात वाचला
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ चांगल्या कामगिरीच्या प्रयत्नात आहेत. पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली असून दुसऱ्या कसोटीत मात्र यजमानांनी त्यांचा खेळ सावरला आहे. बुधवारी (२१ ऑक्टोबर) या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती बिकट झाली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने २८ धावा केल्या आणि कसोटी कारकिर्दीत एक उल्लेखनीय टप्पा गाठला.
गकेबरहा येथे सुरू असलेल्या कसोटीत स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ८८ चेंडूंत २ चौकारांसह २८ धावा केल्या. याबरोबरच त्याने ११००० कसोटी धावाही पूर्ण केल्या. तो कसोटीमध्ये ११००० धावांचा टप्पा गाठणारा केवळ तिसराच ऑस्ट्रेलियन आणि एकूण १२ वा क्रिकेटपटू ठरला आहे.
स्मिथचा हा १२७ वा कसोटी सामना आहे आणि त्याने हा महत्त्वाचा टप्पा पार केला. तो डावाच्या संख्येनुसार सर्वात जलद ११००० कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी आला आहे. त्याने २२६ डावांमध्ये ही कामगिरी केली. हा पराक्रम करताना त्याने भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक कॅलिस यांना मागे टाकले आहे.
द्रविड आणि कॅलिस या दोघांनी २३४ डावांमध्ये ११००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानी आहे. त्याने २२३ डावांमध्ये ११००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. पहिल्या स्थानी २०८ डावांसह श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा आहे. दुसऱ्या स्थानावर ब्रायन लारा आहे. त्याने २१३ डावांमध्ये ११००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.
सर्वात जलद ११००० कसोटी धावा पूर्ण करणारे खेळाडू (डावांच्या संख्येनुसार)
208 – कुमार संगकारा (श्रीलंका)
२१३ – ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
222 – रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
२२३ – सचिन तेंडुलकर (भारत)
२२६ – स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
२३४ – राहुल द्रविड (भारत)
२३४ – जॅक कॅलिस (भारत)
२३७ – महेला जयवर्धने (श्रीलंका)
२३८ – जो रूट (इंग्लंड)
२५२ – ऍलिस्टर कूक (इंग्लंड)
२५६ – शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)
कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे (सामने)
१५९२१ – सचिन तेंडुलकर (२००)
१४२७८ – जो रूट (१६९)
१३३७८ – रिकी पाँटिंग (१६८)
१३२८९ – जॅक कॅलिस (१६६)
१३२८८ – राहुल द्रविड (१६४)
१२४७२ – ॲलिस्टर कुक (१६१)
१२४०० – कुमार संगकारा (१३४)
11953 – ब्रायन लारा (131)
११८६७ – शिवनारायण चंद्रपॉल (१६४)
११८१४ – महेला जयवर्धने (१४९)
१११७४ – ऍलन बॉर्डर (१५६)
११००० – स्टीव्ह स्मिथ (१२७)
सामन्याची स्थिती,
दक्षिण आफ्रिका पहिला डाव – ४२५/९ (घोषित)
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – ९९
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – ६५/१ (२१) (फॉलो-ऑन)
(स्टीव्ह स्मिथने 11000 कसोटी धावा पूर्ण केल्या! राहुल द्रविडला मागे टाकले; सचिन तेंडुलकर थोडा पुढे राहिला, SAvsAUS दुसरी कसोटी)
Comments are closed.