शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40 लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं?
मुंबई: भारतीय शेअर बाजारात आजचा दिवस घसरणीचा ठरला. आयटी कंपन्यांच्या शेअरची विक्री, जागतिक दबावामुळं भारतीय शेअर बाजारात आज भूकंप झाला. ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये देखील 350 अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 7.40 लाख कोटी बुडाले.
Stock Market Crash : शेअर बाजार क्रॅश
सेन्सेक्स शुक्रवारी (13 जानेवारी) रोजी 1.25 टक्क्यांनी म्हणजेच 1140 अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.. गुरुवारी सेन्सेक्स 83674.92 अंकांवर बंद झाला होता, त्या तुलनेत आज सेन्सेक्स 82534.55 अंकांपर्यंत खाली आला होता. अखेर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 1048 अंकांनी घसरुन 82627 अंकांवर बंद झाला. निफ्टीचा विचार केला तर 336 अंकांनी घसरुन 25471 अंकावर आला.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. हिंदूस्तान युनीलिवर, इटरनलचे शेअर चार टक्क्यांनी घसरले. टाटा स्टील, टायटन, टीसीएस, पॉवरग्रीड आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 2 टक्क्यांनी घसरले. बीईएल, एशियन पेंटस, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, अदानी पोर्टस, एचसीएल टेक्नोलॉजीज, एनटीपीसी, इन्फोसिस, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडिगोच्या शेअरमध्ये एक ते दोन टक्के घसरण झाली. सनफार्मा, ट्रेंट, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, भारती एअरटेल एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि एल अँड टीचे शेअर घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारातील घसरणीची कारणं?
आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये होणारी घसरण, जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि भू राजनैतिक अनिश्चिचतता यामुळं गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. आयटी क्षेत्रात सर्वात मोठी घसरण झालं. एडीआरवर लिस्ट असलेल्या इन्फोसिस आणि विप्रोच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली.
शुक्रवारी निफ्टी आयटी निर्देशांक 4 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. टीसीएस,इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. अँथ्रोपिकच्या कॉर्पोरेट लीगल टीमनं नवं टूल आणलं आहे त्यामुळं गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.
अमेरिकन बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. अमेरिकन बाजारात Nasdaq च्या शेअरमध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली. डाऊ जॉन्स आणि एस अँड पी 500 मध्ये देखील मोठी घसरण झाली. आशियाई बाजारात देखील हाच ट्रेंड दिसून आला. डॉलर मजबूत होणे आणि रुपया कमजोर झाल्यानं बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.