शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स- निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला
आज शेअर बाजार मुंबई : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. 27 फेब्रुवारी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरणीसह ट्रेडिंग सुरु झालं. 11.35 वाजेपर्यंत सेन्सेक्स 589.41 अंकांच्या घसरणीसह 81659.20 वर पोहोचला होता. तर, निफ्टी 50 निर्देशांक 212.55 अंकांच्या घसरणीसह 25284 वर पोहोचला.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये 28.13 अंकांच्या घसरणीसह ट्रेडिंगसह सुरुवात झाली. सेन्सेक्सवर ट्रेडिंग 821220.48 अंकांवर ट्रेडिंग सुरु झालं. एनएसई निफ्टीत देखील घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 50 वर 36.70 अंकांच्या घसरणीसह सुरुवात झाली. निफ्टी 50 वर ट्रेडिंग 25459.85 वर सुरु झालं.
सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्समध्ये 253 अकांची घसरण झाली होती. सेन्सेक्स 81994 अंकांवर पोहोचला होता. तर, निफ्टीमध्ये 83 अंकांची घसरण झाली होती. निफ्टी 50 मध्ये 25412 अंकांवर ट्रेडिंग सुरु होतं.
बीएसईवर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इटरनल, टीसीएस आणि ट्रेंटच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, मारुती सुझूकी, इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल आणि रिलायन्सच्या स्टॉकमध्ये घसरण झाली.
गुरुवारी काय स्थिती होती?
भारतीय शेअर बाजारात 26 फेब्रुवारीला फार तेजी किंवा घसरण पाहायला मिळाली नाही. सेन्सेक्स 27.46 अंकांच्या घसरणीसह 82248.61 वर बंद झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 14.05 अंकांच्या तेजीसह 25496.55 अंकांवर बंद झाला होता.
गुरुवारी बीएसईवर अदानी पोर्टस, मारुती सुझूकी, भारती एअरटेल, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी होती. तर, ट्रेंट, एटरनल, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंटच्या स्टॉकमध्ये घसरण झाली होती.
गुरवारी निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात तेजी होती. निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये घसरण झाली होती. गुरवारी बीएसई सेन्सेक्सवरील 30 पैकी 13 शेअर तेजीसह बंद झाले होते. तर 17 शेअरमध्ये घसरण झाली होती.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.