सेन्सेक्स निफ्टीत हाहाकार सुरु असताना HDFC नं केलं मालामाल, टीसीएसचे गुंतवणूकदार होरपळले

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी पडझड पाहायला मिळाली. सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांना नुकसान सहन करावं लागलं. या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य 3.09 लाख कोटींनी घटलं. एचडीएफसीनं गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न दिले तर टीसीएसच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.सेन्सेक्स गेल्या आठवड्यात 2112.96 अंकांनी म्हणजेच 2.80 टक्क्यांनी घसरला तर निफ्टी 50 एकूण 671.2 अंकांनी म्हणजेच 2.94 टक्क्यांनी घसरा. याचा सर्वात मोठा फटका टीसीएसला बसला. या कंपनीचं बाजारमूल्य 1.09 लाख कोटी रुपयांनी घसरलं. टीसीएसचं बाजारमूल्य 12.60 लाख कोटी इतकं राहिलं. टीसीएस दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरलं आता एचडीएफसी बँक दुसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.

गुंतवणूकदारांचं नुकसान करण्यात टीसीएसनंतर इन्फोसिसचा क्रमांक  राहिला. इन्फोसिसचं बाजारमूल्य 52697.93 कोटी रुपयांनी घसरुन 7.01 लाख कोटी रुपयांवर आलं. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 39230.1  कोटी रुपयांनी घसरुन 8.94 लाख कोटींवर आलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 38025.97 कोटींनी घसरुन 16.23 लाख  कोटींवर आलं. एसबीआयचं बाजारमूल्य 29718.99 कोटींनी घसरुन 6.14 लाख कोटींवर आलं आहे. आयसीआयसीआय बँकेंला देखील नुकसान झालं, त्यांचं बाजारमूल्य 20775.78 कोटींनी घसरुन 8.49 लाख कोटींवर आलं. एचयूएलचं बाजारमूल्य 11700.97 कोटींनी घसरुन 5.14 लाख कोटी, आयटीसीचं बाजारमूल्य 7882.86 कोटींनी घसरुन 4.93 लाख कोटींवर आलं.

एकीकडे सेन्सेक्सवरील टॉप टेन कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य घटत असताना दुसरीकडे एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्सचं बाजारमूल्य वाढलं. एचडीएफसी बँकेंचं बाजारमूल्य 13.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. आठवड्यात बँकेच्या गुंतवणूकदारांना 30258.49 कोटींचा फायदा झाला. तर, बजाज फायनान्सचं देखील बाजारमूल्य वाढलं असून ते 5.29 लाख कोटींवर पोहोचलं. गेल्या आठवड्यात या गुंतवणूकदारांना 9050.24 कोटी रुपयांचा फायदा झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीजला सेन्सेक्सवर मोठं नुकसान सहन करावं लागलं असलं तरी बाजारमूल्य विचारात घेता टॉप टेन कंपन्यांमध्ये रिलायन्स पहिल्या स्थानावर आहे. यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय,बजाज फायनान्स, हिंदूस्थान यूनिलिव्हर आणि आयटीसीचा क्रमांक लागतो.

इतर बातम्या :

LPG Price Hike: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडरचे दर वाढले, काय आहेत नवे दर?

मोठी बातमी! शेअर मार्केटमध्ये घसरण, सेन्सेक्स 1 हजार 414 अंकांनी गडगडला

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.