नोएडामध्ये दुसऱ्या दिवशीही दगडफेक आणि तोडफोड

वेतनात वाढ तरीही कामगारांकडून निदर्शने सुरूच

वृत्तसंस्था/ नोएडा

उत्तरप्रदेशच्या नोएडा येथे वेतनवाढीवरून आक्रोशित कामगार उत्तरप्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या दिलाशानंतरही निदर्शने करत आहेत. किमान वेतनात वृद्धीनंतरही नोएडामध्ये सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये दगडफेक आणि तोडफोड यासारख्या घटना घडल्या आहेत. याचबरोबर अनेक औद्योगिक भागांमध्ये कारखान्यांबाहेर कामगार निदर्शने करत आहेत. तर तणावादरम्यान बहुतांश औद्योगिक भागांमध्ये कामकाज ठप्प आहे.

नोएडाच्या सेक्टर 70 मध्ये क्लियो काउंटी सोसायटीनजीक लोकांनी दगडफेक आणि तोडफोड केली आहे. या लोकांनी पोलिसांनाही लक्ष्य केले. सेक्टर 70 बरोबरच सेक्टर 80 मध्ये तणावाची स्थिती राहिली. सेक्टर 80 मधील काही कारखान्यांबाहेर एकवटलेल्या निदर्शकांनी हिंसा करण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क पोलिसांनी स्थिती बिघडू दिली नाही.

कारवाई गतिमान

सेक्टर 70 मध्ये दगडफेक करणाऱ्या 15 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सोमवारी निदर्शनांदरम्यान हिंसा करणाऱ्या लोकांची ओळख पटवून धरपकड केली जात आहे. पोलिसांनी 300 हून अधिक जणांना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 7 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तर 2 जणांवर सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी वाढविली सुरक्षा

गौतमबुद्धनगर जिल्ह्dयातील बहुतांश औद्योगिक क्षेत्रांमध्ये कामगार निदर्शने करत आहेत. पोलिसांनी संवेदनशीतला पाहता सुरक्षा वाढविली आहे. निदर्शकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. सरकारने किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरीही अफवा पसरविल्या जात असल्याने तणाव कायम आहे.

Comments are closed.