इंग्रजीचा पेपर बघताच टेन्शन वाढलं, पुण्यातील विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी टाकली
पुणे: राज्यात कालपासून बारावीच्या (HSC Exam Pune) परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेचा काही मुलं ताण घेताना दिसत आहेत, तर काही मुलं परीक्षा ताण योग्य रितीने सांभाळताना दिसत आहेत. अशातच राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा (HSC Exam Pune) ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील नऱ्हे येथील परीक्षा केंद्रामध्ये काल (मंगळवारी, ता- 11) ही घटना घडली. बारावीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू झाली. यंदा परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी, कॉपी टाळण्यासाठी राज्य मंडळासह शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासनाकडून कठोर उपायोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी कॅमेऱ्यांचा देखील वापर केला जात आहे.
दरम्यान, पुणे विभागीय मंडळाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (मंगळवारी, ता- 11) नऱ्हे येथील परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू झाल्यावर अर्ध्या तासानंतर एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून खाली उडी मारली. आधी तो पहिल्या मजल्यावर पडला. त्यानंतर त्याने पुन्हा उडी मारली. या वेळी शिक्षण विभागाचे भरारी पथक संबंधित परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उडी मारल्याने जखमी झालेल्या संबंधित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याने उडी मारल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
विद्यार्थी आधी पहिल्या मजल्यावर पडला अन्…
परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासामध्येच विद्यार्थ्यांने उडी मारली. बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने त्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली. आधी तो पहिल्या मजल्यावर पडला. पण, त्यानंतर त्याने पुन्हा एकदा उडी मारली. या वेळी शिक्षण विभागाचे भरारी पथक संबंधित परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उडी मारल्याने जखमी झालेल्या संबंधित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या पेपरने
परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या पेपरने (HSC Exam Pune) झाली असून राज्यातून 15 लाख पाच हजार 37 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पुणे विभागीय मंडळातून दोन लाख 58 हजार 34 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंद केली आहे. परीक्षा केंद्रांवर सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी-पालकांची गर्दी झाली होती. शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षार्थीचे औक्षण करून, त्यांना फुलं देऊन, परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अधिक पाहा..
Comments are closed.