दिलीप मानेंचा भाजपमध्ये प्रवेश, सुभाष देशमुख म्हणाले त्यांच्या प्रवेशाला मी होकार दिला नाही
दिलीप माने भाजपवर सुभाष देशमुख काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या भाजप प्रवेशामुळं आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या संदर्भात सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्यांना कोणतेही तिकीट दिले जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग जर तिकीट द्यायचं नसेल तर हा प्रवेश का घेतला? असा सवाल सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाला मी एक टक्के देखील होकार दिलेला नाही असे देशमुख म्हणाले. मला काही माहिती नाही, पालकमंत्री बोलले होते की मला विचारात घेतलं जाईल. पण मला या संदर्भात काहीही माहिती नाही, तुम्ही हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारा असे देशमुख म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या निवडणुका झाल्यावर दिलीप मानेंचा प्रवेश घ्यायला हवा होता
मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती, कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या होत्या. कार्यकर्त्यांनी समोर जाऊन देखील त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी यांनी मला काल जेव्हा विचारलं तेव्हा मी तेव्हा माझ्या भावना कायम असल्याचे सांगितलं होतं. माझं प्रवेश घेण्याला विरोध नाही पण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की नेत्यांची निवडणूक झाल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक असताना त्यांना भागीदार करू नका असं म्हटलं होतं असे देशमुख म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलायला सांगितलं होत मी त्यांना देखील सांगितलेलं होत. आमचा विरोध नाही पण कार्यकर्त्यांच्या निवडणूक झाल्यावर दिलीप मानेंचा प्रवेश घ्यायला हवा होता असे देसमुख म्हणाले.
प्रवेश झालेला आहे, आता आम्ही कार्यकर्त्यांना हा निरोप कळवू
भाजप वाढावा ही आमची देखील भावना आहे. 2004 मध्ये सोलापूरच्या जनतेने मला काही नसताना खासदार केलं होतं. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत माढ्यात गेलो होतो. पवार साहेबांचा विरोधात देखील मी चांगली मतं मिळवली होती. पार्टी वाढली पाहिजे यासाठी प्रवेश होतात. पण काही फीडबॅक चुकीचे जातायत असं मला वाटत असल्याचे सुभाष देशमुख म्हणाले. सोलापूर महापालिकेत दोन्ही देशमुखांनी मिळून 49 नगरसेवक आणले होते. सोलापूर मध्यला तर आमचा आमदार देखील नव्हता असे देशमुख म्हणाले. पक्ष संघटना, नेते हे एखाद्याला उमेदवारी देतात. त्या उमेदवाराचा प्रचार करणे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. प्रवेश झालेला आहे आता आम्ही कार्यकर्त्यांना हा निरोप कळवू. कार्यकर्ते, नागरिक हा निर्णय स्वीकारतात का बघू असे देशमुख म्हणाले.
दिलीप माने हे पटवण्यात हुशार
मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता आहे. दिलीप माने हे पटवण्यात हुशार आहेत. मागच्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुखांना त्यांनी पटवलं. यावेळी सचिन कल्याणशेट्टी यांना पटवलं. पण मी दोन्ही निवडणुकांच्या वेळी भाजप म्हणून या निवडणुकात उतरलो होतो असे देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Solapur News: भाजप प्रवेशाला सुभाष देशमुखांच्या विरोध, दिलीप मानेंना आता अजित पवार गटाची ऑफर; थेट निवडणुकीत नेतृत्व करण्याचा प्रस्ताव
आणखी वाचा
Comments are closed.