सुदर्शन चक्राची बचावात्मक शक्ती अधिक घातक होईल
क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राच्या उत्पादनाची बीईएलकडून तयारी : 30 हजार कोटीच्या कराराला लवकरच मंजुरीची शक्यता
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची तयारी सुरू झाली आहे. शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन हल्ले रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाइल (क्यूआरएसएएम) प्रणालीच्या उत्पादनासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) सज्ज होत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांनी विकसित केलेल्या या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीसाठी सुमारे 30 हजार कोटी ऊपयांचा संरक्षण करार प्रस्तावित आहे. या कराराला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उत्पादनाची पूर्वतयारी
?सरकारी मंजुरीपूर्वीच बीईएलने उत्पादनाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
?फर्स्ट ऑफ प्रॉडक्शन मॉडेल (एफओपीएम) तयार करण्याचे काम सुरू.
?क्षेपणास्त्र प्रणालीच्या पात्रता चाचण्यांची (क्वालिफिकेशन टेस्टिंग) तयारी.
?आवश्यक यंत्रसामग्री आणि उत्पादन सुविधांवर काम.
?सुटे भाग आणि तांत्रिक उपकरणांच्या पुरवठादारांशी समन्वय. भारतीय लष्करासाठी का महत्त्वाची?
?युद्धभूमीवर पुढे जाणाऱ्या लष्करी तुकड्यांना हवाई संरक्षण.
?शत्रूच्या हवाई हल्ल्यांना जलद प्रत्युत्तर देण्याची क्षमता.
?आधुनिक युद्धातील ड्रोन आणि हवाई धोक्मयांचा मुकाबला करण्यासाठी उपयुक्त.
?स्वदेशी तंत्रज्ञानामुळे देखभाल आणि उत्पादन व्यवस्थेत देशांतर्गत क्षमता वाढणार.
पुढील टप्पा काय?
आता सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची मंजुरी, अंतिम करार आणि उत्पादनाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर क्यूआरएसएएम प्रणालीच्या उत्पादनाला अधिकृतपणे गती मिळू शकते. त्यामुळे भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण क्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
क्यूआरएसएएम प्रणालीची वैशिष्ट्यो
जलद प्रतिसाद: शत्रूकडून हवाई हल्ला झाल्यास तातडीने प्रत्युत्तर देण्याची क्षमता.
30 किलोमीटरपर्यंत मारा: सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील हवाई लक्ष्य भेदण्याची क्षमता.
360 अंश रडार: सर्व दिशांनी येणाऱ्या हवाई धोक्मयांवर लक्ष ठेवण्याची सुविधा.
ड्रोनविरोधी क्षमता: शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांना लक्ष्य करण्यासाठी उपयुक्त.
फिरत्या लष्करी तुकड्यांना संरक्षण: लष्कराच्या हालचालींसोबत ही प्रणालीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान: हवाई लक्ष्यांचा शोध, मागोवा आणि अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी विकसित प्रणाली.
Comments are closed.