सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत मोठी अपडेट, आज प्रवेश होणार की नाही?
सुधाकर बॅडगुझर नशिक: आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन नाशिकवरुन मुंबईला भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी निघालेल्या सुधाकर बडगुजर हे पक्षात येणार असल्याची बाब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना माहिती नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हात झटकले होते. परिणामी मोठा गाजावाजा करत नाशिकवरुन मुंबईकडे रवाना झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या भाजप (BJP) पक्षातील प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली होती. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला माहिती आणि संमती नसताना सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा पक्षप्रवेश कसा होणार, असा प्रश्न विचारला जात होता. परंतु, याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश हा ठरल्यानुसार दुपारी एक वाजताच पार पडेल, असे सांगितले जात आहे.
काल रात्री उशीरा पक्षश्रेष्ठींच्या झालेल्या बैठकीत सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या घडामोडींची कल्पना कोणीही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली नव्हती. परिणामी मंगळवारी सकाळी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच अनभिज्ञ असल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजर काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांना रिकाम्या हातीच नाशिकला परतण्याची नामुष्की सहन करावी लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर सुधाकर बडगुजर यांना विचारले असता त्यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत बोलण्यास नकार दिला. मी मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल. सर्व ठरले आहे त्याशिवाय मी जातोय का?, असा प्रतिसवाल सुधाकर बडगुजर यांनी केला.
https://www.youtube.com/watch?v=9djtxt6tyyi
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.