वेळेआधीच उसाला फुटले तुरे, वाढही खुंटली, यंदा 20 ते 25 टक्के साखरेचं उत्पन्न घटणार
ऊस: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सगळ्यात चिंतेची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचा उतारा कमी आहे. उसाची वाढ खुंटल्यानं वेळेआधीच उसाला तुरे फुटले आहेत. परिणामी ऊसाच्या उताऱ्यावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं यंदा साखरेचं उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के साखरेचं उत्पन्न घटणार आहे.
गेल्यावर्षी 319 लाख टन साखरेचं उत्पादन , यंदा 270 लाख टन होण्याचा अंदाज
यावर्षी देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी 319 लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं. यंदा मात्र 270 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस गाळप हंगाम मार्च अखेरीस संपण्याची शक्यताही महासंघाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडला होता. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आता मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील यंदाचा ऊस गाळप हंगाम ऊसाअभावी मार्चच्या शेवटी संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऊस टंचाईमुळे राज्यातील कारखान्यांचे हंगाम फेब्रुवारी अखेरीस बंद होणार
ऊस टंचाईमुळं साखर कारखान्यांना अपेक्षित ऊस गाळप करणे मोठे आव्हान आहे. यासाठी उसाला जादा दर द्यावा लागणार आहे. हे सर्व झाले तरी ऊस टंचाईमुळे राज्यातील कारखान्यांचे हंगाम फेब्रुवारी महिन्यांचे शेवटच्या आठवड्यात बंद होण्यास सुरुवात होईल.
महाराष्ट्रात यंदा 196 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू
राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाच्या ताज्या अहवालानुसार गेल्यावर्षी जानेवारीमध्ये देशातील 524 साखर कारखान्यांचं गाळप सुरू होतं. यंदा मात्र देशातील 507 साखर कारखान्यांचं जानेवारीमध्ये गाळप सुरू आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी 206 कारखाने सुरू होते. यंदा मात्र 196 कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. तर उत्तर प्रदेशमधील 122 आणि कर्नाटकमधील 77 कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी अनुक्रमे 120 आणि 74 कारखान्यांचं गाळप सुरू होतं. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधन घातलेली आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात बंदी हटवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यावरही नाईकनवरे यांनी साखरेच्या निर्यातीला आंशिक मान्यता देण्यात आल्याचा निर्णया योग्य वेळी घेण्यात आल्याचं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
अधिक पाहा..
Comments are closed.