सुनील बागूल, मामा राजवाडे ‘पवित्र’ झाले, भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, नाशिकमध्येच पक्षप्रवेश

नाशिक बातम्या: ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या रविवारी नाशिकमधे (Nashik)  हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे बोललं जात आहे. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करत सुनील बागूल आणि मामा राजवाडे भाजपत दाखल होणार आहेत. तर सुनील बागूल यांच्यांसह काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या रविवारी या पक्षप्रवेशावेळी अजून कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला! नाशिकमध्येच होणार पक्षप्रवेशाचा सोहळा

दरम्यान, मामा राजवाडे आणि सुनील बागूल यांचावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र नाट्यमयरित्या तक्रारदाराने गुन्हे मागे घेतल्यानं बागुल आणि राजवाडे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. सुनील बागूल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने ते सध्या ठाकरेंच्या शिबसेनेतही नाहीत आणि भाजपामध्येही देखील नाहीत, यामुळे त्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. आता सुनील बागुल यांच्या भाजपमधील रखडलेल्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून नाशिकमध्येच हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.

तक्रारदाराने तक्रार घेतली मागे

दरम्यान, मामा राजवाडे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दुसरीकडे, या दोघांकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. तो मिळेपर्यंत बागूल, राजवाडे अज्ञातवासात होते. त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी या दोघांची नोंद ‘फरार’ अशी झाली होती. यामुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. त्यानंतर तक्रारदार गजू घोडके यांनी तक्रार मागे घेतल्याने सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतरच या दोघांचा भाजप प्रवेशाचे भवितव्य अवलंबून होते. मात्र आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेण्याबाबत अर्ज दिल्याने सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा नाशिकमध्येच भाजपप्रवेश होणार आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.