अखेर सुनील बागुल, मामा राजवाडेंचा भाजपमध्ये प्रवेश, गिरीश महाजनांची तंबी, म्हणाले, हा शेवटचा प्

सुनील बागुल मामा राजवाडे: ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागूल (Sunil Bagul), माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा आज नाशिकमध्ये भाजप (BJP) प्रवेश पार पडला. यावेळी दोन्ही नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्या उपस्थितीत बागुल, राजवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम साजरे होत असताना नाशिकमध्ये भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. तर पक्ष प्रवेशावेळी गिरीश महाजन यांनी सुनील बागुल यांना तंबी दिल्याचे पाहायला मिळाले.

या पक्ष प्रवेशावेळी गिरीश महाजन म्हणाले की, सुनील भाऊ यांचा हा शेवटचा प्रवेश आहे. परत आता इकडे-तिकडे जाऊ नका. मागच्या वेळी बडगुजर आले, सर्वांना भाजपमध्ये यावे, असे वाटते आहे. नरेंद्र मोदी नावाचे वादळ राज्यात देशात नाही तर जगभर आहे. जगात कुठेही जा मोदी, इंडीया, भारत याच नावाची चर्चा आहे. पोपटपंची करणारे खूप लोक आहेत. सकाळ पासून काही लोक सुरू होतात, असे म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

भाजप हाऊसफुल्ल झाले

गिरीश महाजन पुढे म्हणाले की,  त्यांच्याकडे कोणी राहिले नाही. बडगुजर होते, नंतर मामा राजवाडे होते, ते ही आता आले आहेत. आता कोण आहे गिते. त्यांना आपल्याला घायचे नाही. आता, भाजप हाऊसफुल्ल झाले आहे. आता कोणाला घ्यायचे नाही, असे म्हणत त्यांनी माजी आमदार वसंत गीते यांच्यावर निशाणा साधला.

सुनील बागुल हा शेवटचा प्रवेश, पुन्हा कुठे जायचे नाही

कोट्यवधी घरात मोदींनी गॅस दिला. लाडकी बहीण योजना सुरू आहे, काहींना भांडे वाटप केले जात आहे. कोरोना काळात संकट आले, त्याचे रूपांतर संधीत केले आणि औषध निर्माण केले. पाकिस्तान, चीन किती त्रास देत होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वांनी धडकी घेतली आणि भारताच्या नादी लागायचे नाही, असे ठरवले. मागचा कुंभमेळा किती मोठा होता, किती छान नियोजन केले. त्यापेक्षा यंदा दुप्पट-तिप्पट गर्दी होणार आहे. त्यामुळे कोणीही वाद न करता एकत्र काम करा. 122 पैकी 100 चा आकडा आपल्याला नाशिक महापालिकेमध्ये पार करायचा आहे. नाशिकमधून रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे. सुनील बागुल आता हा शेवटचा प्रवेश आहे. पुन्हा कुठे जायचं नाही, असे गिरीश यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Sanjay Raut on Girish Mahajan : गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय, तो फडणवीसांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

आणखी वाचा

Comments are closed.