राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले…

सुनील तटकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काल रात्री शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नाव वगळल्याची यादी माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने त्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं. शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवर देखील भाष्य केलं. (Sunil Tatkare Meets Sharad Pawar)

काल दिवसभर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (धूळ पटेल आणि सुनील तटकरे) यांचं नावं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादीच्या एका पत्रामधून ही नावं वगळ्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक आणि क्लेरिकल चूक असल्याचं स्पष्टीकरण सुनेत्रा पवारांनी दिलं. त्यानंतर संध्याकाळी सुनील तटकरे पवारांच्या भेटीला पोहोचले. या भेटीनंतर तटकरेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीय. शरद पवारांची तब्येत गेली काही दिवस ठिक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली. या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नाही, कोणतंही राजकारण नाही, असंही सुनील तटकरे म्हणाले. (Sunil Tatkare Meets Sharad Pawar)

सुनील तटकरेंची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया, काय म्हणाले? (Sunil Tatkare Meets Sharad Pawar)

आजची भेट ही केवळ तब्येतीची विचारपूर करण्यासाठी होती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी वेळ मागितला होता. आणखी कोणताही विषय नाही. आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली जे काही आम्ही काम करतोय ते ठामपणे कायम राहणार आहे, असं सुनील तटकरेंनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या पत्रावर काय म्हणाले? (Sunil Tatkare Meets Sharad Pawar)

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या पत्राचा आणि शरद पवारांच्या भेटीचा काहीही संबंध नाही. यासंदर्भात स्वत: सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलं आहे. या विषयावर मला काही बोलायचं नाही. आजची भेट ही केवळ शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. तर आपण महासचिव पदावर आहात का?, असं विचारताच सुनील तटकरे न बोलता निघून गेले.

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल काय निर्णय घेणार? (Sunil Tatkare Meets Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मंगळवारी दिवसभर सुनील तटकरे यांना महासचिव आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरून काढले आहे, अशी चर्चा सुरू असताना त्याचवेळी सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आता काही वेगळा निर्णय तर हे दोन्ही नेते घेत नाहीत ना अशा चर्चेला सुरुवात झाली आहे. कारण सुनील तटकरे यांना आपण महासचिव पदावर आता असणार की नसणार असा प्रश्न विचारताच त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगल्याची पाहिला मिळाल. शरद पवारांची तब्येत पाहण्यासाठी आपण आलो होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तब्बल 3 वर्षानंतर सुनील तटकरे हे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांना भेटायला आल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांच्या एक्स अकाउंटवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पोस्ट करत टायपो मिस्टेक असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु मार्च महिन्यात देखील निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या मिनिट्समध्ये देखील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांपुढे काहीच न लिहिल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे आता पुन्हा हाच प्रकार घडल्यामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

संबंधित बातमी:

Sharad Pawar : मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा

आणखी वाचा

Comments are closed.