विकृती मनोवृत्ती ठेचून नव्हे चौकशी करून फाशीच द्यावी; अशोक खरात प्रकरणावर सुनील तटकरेंचं विधान

अशोक खरात गुन्ह्यावर सुनील तटकरे धाराशिव : राज्यासह देशभरात सध्या चर्चेत असलेला नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरण केंद्रस्थानी असून दिवसागणिक अशोकचे एकापेक्षा एक कारनामेही समोर येत आहेत. त्यातच, अशोक खरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. ते धाराशिवमध्ये (धाराशिव) आले असता त्यांनी यावेळी हे भाष्य केलं आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी आणि जलद गतीने तपास पूर्ण करावा, अशीही मागणी त्यांनी केली. या प्रकरणात ज्यांचा ज्यांचा संबंध आढळेल, त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केलेहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असताना माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.

Sunil Tatkare : पक्षातील नाराजीनाट्यानंतर सुनील तटकरे हे पहिल्यांदाच सोलापुरात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या गोंधळाच्या चर्चानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज सोलापुरात आले आहे. सुनील तटकरे यावेळी पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूरात देवदर्शन घेण्यासाठी रात्री सोलापुरात दाखल झालेत्यामुळे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पत्र देताना प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे नाराजीनाट्य पाहायला मिळालं. त्यानंतर सुनील तटकरे हे पहिल्यांदाच सोलापुरात आले असून आज दिवसभर ते देवदर्शन करणार आहेत. तर रात्री उशिरा सोलापुरात पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.