कुलदीपसिंग सेंगरसाठी 'सर्वोच्च' धक्का

उन्नाव बलात्कार प्रकरणी सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2017 च्या उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यापूर्वी याप्रकरणी सीबीआयकडून दाखल एका याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगित केले होते.

दोन महिन्यांच्या आत या प्रकरणी नव्याने निर्णय घ्यावा असा निर्देश सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिला आहे. जून 2017 मध्ये उत्तरप्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात तत्कालीन भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा न नेंदविल्याने पीडितेने लखनौमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, ज्यानंतरच 9 एप्रिल 2018 रोजी सेंगर विरोधात गुन्हा नोंद झाला होता. तर या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आल्यावर सेंगर यांना अटक झाली होती.

Comments are closed.