कधी खलनायक बनून पसरवली होती दहशत, पण फ्लॉपचा टॅग लागल्यानंतर अभिनयाला ठोकला रामराम – Tezzbuzz
महेश भट्ट हे एक प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक आहेत. त्याच्या सोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार, अनेक नवीन चेहरे अभिनेते आणि अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन येतात, पण त्यापैकी काहींनाच संधी मिळते. तर असा अभिनेता ज्याने सुष्मिता सेनसोबत पदार्पण केले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 1996 मध्ये त्याने ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तर हा अभिनेता म्हणजे शरद कापूर (kapoor)आहे. या अभिनेत्याने नायक म्हणुन उत्तम काम केले पण त्याच्या काहि चुका मुळे निर्णयामुळे त्याने आपले करिअर उद्ध्वस्त केले.
अनेक अभिनेते या क्षेत्रात काम करुन त्यातुन ते पुन्हा गायब झाले त्यातील एक नाव म्हणजे त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर त्याला अनेक ऑफर्स मिळाल्या असल्या तरी, त्याच्या करिअरचा आलेख उंचावण्यात अपयशी ठरला. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि दिसण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याला नायक म्हणून नव्हे, तर खलनायक म्हणून ओळख मिळाली. असे असूनही, तो चित्रपटांमध्ये अपेक्षित यश मिळवू शकला नाही. कठोर परिश्रमानंतर त्याला ‘स्वाभिमान’ या चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. त्याच्या अभिनयाने दिग्दर्शक महेश भट्ट यांना त्याला त्यांच्या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून घेण्यास प्रेरित केले.
शरद कपूर यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले. त्यानी 43 चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर, शरद कपूर यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. यश न मिळाल्याने, त्यांनी अभिनयासोबतच रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला. आणि अभिनयाला कायमची राम राम ठोकला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
300 हून अधिक चित्रपटांत काम केलं, पण ‘रामायण’मध्ये काम करुन जिंकली प्रेक्षकांची मने
Comments are closed.