राज्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होताच सुप्रिया सुळे अमित शाहांची भेट घेणार; नेमकं कारण काय?
Supriya Sule Amit Shah Meet: मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम (Municipal Corporation Election 2025) जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. याचदरम्यान, आता महत्वाची माहिती समोर आली आहे. (Supriya Sule Amit Shah Meet)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे शिष्टमंडळ अमित शाहांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात अमित शाहांसोबत भेट होणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण, विमा कंपन्या आणि बँकांची मनमानी यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. (सुप्रिया सुळे अमित शहा यांची भेट)
पुण्यात काका-पुतण्या एकत्र? (Sharad Pawar-Ajit Pawar Alliance In Pune?)
महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला. याला काही तास उलटले न उलटले, पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं.. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली. यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तेंव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा अन शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला असा दावा नाना काटे यांनी केला. काटे आणि गव्हाणे यांनी अजित दादा आणि सुप्रिया ताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतचं ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.