पक्ष, घरं फोडून झालीत ना? आता निर्णय घेण्याची वेळ आलीय; सुप्रिया सुळेंचा सीएम देवेंद्र फडणवीसां

Supriya Sule on Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, “आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे. त्यामुळे एकीकडे सरकारवरचा दबाव वाढत चालला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते त्यांची घेत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुले) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे आणि सुप्रिया सुळे यांच्यात काही काळ चर्चा देखील झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून प्रहार केलाय.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी याकडे आधी लक्ष द्यावं आणि निर्णय घ्यावा. तुम्ही आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली आणि सत्ता स्थापन केली ना. मुख्यमंत्री बनले ना? मग आता सत्तेत आहात. सरकार तुमचं आहे आणि निर्णयही तुम्हाला घ्यायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही आम्हाला काय विचारताय? आमच्यावर का टाकताय? याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे, हे विरोधकांवर टाकू नका, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

तुम्ही चुटकीत प्रश्न सोडवू शकतात

सर्वपक्षीय बैठक लवकरात लवकर बोलवा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, सगळ्या पक्षांनी मिळून एकत्र यावर मार्ग काढू, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, नुसत्या गाड्यांमध्ये फिरून आणि प्रायव्हेट विमानात फिरून सत्ता चालवता येत नाही. मायबाप जनतेचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. विखे पाटील हे पवार साहेबांबद्दल बोलत आहेत ते किती वर्ष सत्तेत काँग्रेसमध्ये होते? तुमच्याकडे अडीचशे आमदार आहेत ना. तुम्ही चुटकीत हा प्रश्न सोडवू शकतात. हे दुर्दैव आहे की, तीन दिवस झाले आंदोलन सुरू आहे. सरकारमधून एकही प्रतिनिधी इथे चर्चा करायला आला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.

सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव

दरम्यान, सुप्रिया सुळे या आझाद मैदानावरून निघत असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार घडला. यावेळी सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. यावेळी मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी देखील गेल्याच्या पाहायला मिळाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,

2. हैदराबाद गॅझेटियरने अंमलात आणले …साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

https://www.youtube.com/watch?v=mpy9ezbm22k

आणखी वाचा

Chhagan Bhujbal OBC Reservation : एकीकडे जरांगेंचं उपोषण, दुसरीकडे छगन भुजबळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; राज्यातील ओबीसी नेत्यांची तातडीने बैठक बोलावली!

आणखी वाचा

Comments are closed.