तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली, सुप्रिया सुळेंचा कोकाटेंना टोला

सुप्रिया सुले: मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)  यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्‍या रोहितला पाठवली असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी कोकाटेंवर टीका केली. कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता असा टोला देखील सुप्रिया सुळे माणिकराव कोकाटे यांना लगावला. सरकारने हद्द केली म्हणत सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवरही टीका.

व्हिडिओ आम्ही नाही काढला मागे बसणाऱ्याने काढलाय

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माणिकराव कोकाटे यांच्या रमी गेम खेळण्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. इंदापूरमधील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर माणिकराव कोकाटे प्रकरणावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. जो माणूस विधिमंडळामध्ये मोबाईलवर गेम खेळत होता, एकतर तो पकडला गेला त्याला आम्ही जबाबदार नाही. तुम्ही बसला होता त्याच्या पाठीमागच्याच माणसाने व्हिडिओ काढला याचा अर्थ व्हिडिओ तुमच्याच विचाराच्या माणसाने काढलाय. समोरच्या लोकांनी तर व्हिडिओ काढला नाही पण बिचार्‍या रोहितला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. अहो व्हिडिओ आम्ही नाही काढला मागे बसणाऱ्याने काढलाय, त्यात आमचा काय संबंध? आम्ही फक्त ट्विटरवर टाकला असं सुळे म्हणाल्या.

जो मुलगा वर्गात कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता

गंमत अशी झाली की दत्तात्रय भरणे यांना शेती खात गेलं आणि कोकाटे यांना क्रीडा खाते मिळालं. पण आता खेळ करताना आम्ही केंद्रामध्ये कायदा पास केला. ज्या गेमवर पैसे लावले जातात ते ऑनलाईन सर्व खेळ या देशात बंद केले आहेत. केंद्र ज्यावेळेस कायदा करते त्यावेळी ते प्रत्येक राज्यासाठी करतं राज्य सरकारने त्याचे नियम करावे लागतात मात्र आता महाराष्ट्रात नियम करताना क्रीडा मंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी हातामध्ये पत्ते खेळण्याची नक्कल करत या कायद्याचे नियम कोण करणार? असा सवाल केला. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र लिहिणार आहे की ज्या मंत्र्याला तुम्हाला बदलावं लागलं का तर तो कामावर बसलेला असताना मोबाईलवर गेम खेळत होता. आता ऑलाईन गेमवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे त्या बंदीवर नियम कायदे बनवायला तोच मंत्री तुम्ही बसवलाय. जो मुलगा वर्गात कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता. आता या सरकारने हद्द केली असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या:

Supriya Sule : आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होतो, त्यावेळी घट्ट व्हायचं… सहन करायला शिक; सुप्रिया सुळेंच्या स्टेटसमागे काय राजकारण?

आणखी वाचा

Comments are closed.