सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात शाहरुख खानची जादू; पाहा VIDEO
सुप्रिया सुळे मुलगी रेवती सुळे लग्न संगीत: माजी मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची लेक रेवती सुळे (Revati Sule Wedding) हिची लगीनघाई सध्या सुरू आहे. रेवतीच्या विवाहसोहळ्याचे (Revati Sule Weds Sarang Lakhani) काही फोटो आणि व्हिडीओ समोर आलेत. रेवतीच्या लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या संगीतसोहळ्याचा असून या सोहळ्यासाठी बॉलिवूडचा किंग शाहरुख खान उपस्थित होता. यावेळी शाहरुख खान, सारंग लखानी आणि सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या शुक्रवारी पार पडलेल्या संगीत सोहळ्याला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने हजेरी लावली होती.
एका व्हायरल व्हिडीओमध्ये, शाहरुख खान (Shah Rukh Khan) 1998 मधील ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर रेवती आणि इतरांसोबत डान्स करताना दिसतोय. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तो त्याची सिग्नेचर पोज देताना दिसतोय. या संगीत कार्यक्रमासाठी शाहरुख खान (Shahrukh Khan At Revati Sule Wedding) काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसला.
खासदार सुप्रिया सुळे (MP सुप्रिया सुळे) यांची लेक रेवती सुळे ही लखानींच्या घरची सून होणार असून उद्योगपती सारंग लखानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झालेली. तर, आज 20 जून रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झालाय. काही दिवसांपासून रेवती सुळेच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रेवतीच्या हळदीच्या कार्यक्रमाचेही फोटो व्हायरल झालेले. ज्यात रेवती पिवळया रंगाच्या साडीत पाहायला मिळतेय. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र अरुण लखानी हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्या निमित्त लग्नापूर्वीच्या विविध सोहळ्यांना, कार्यक्रमांना सुरूवात झाली असून नुकतीच सुप्रिया सुळेंच्या घरी पूजा झाली. त्याचेही फोटो व्हायरल झालेले.
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या. तर रेवती सुळे शरद पवारांची नात आहे. तिनं London School of Economics मधून शिक्षण पूर्ण केलंय. बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रथमच सक्रीय राजकीय सहभाग घेत आईसाठी प्रचारही केला होता. या विवाहसोहळ्याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या विवाहसोहळ्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
सुप्रिया सुळेंचा होणारा जावई सारंग लखानी कोण?
सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. ते एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अर्जुन तेंडुलकर वेड्स सानिया चंधोक : अर्जुन-सानिया लग्नबंधात! स्टायलिश लुकिंग चष्म्यासह लक्ष्य ठेवा
Comments are closed.