पार्थ पवारांसोबत अनेक वेळा दिसली, आता रेवती सुळेंच्या लग्नात सुनेत्रा पवारांसोबत एन्ट्री, कोण आ

रेवती सुळे लग्नात पार्थ पवारची कायनात धरसोबत एन्ट्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा लग्नसोहळा आज मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच पार पडला. भाजप आमदार आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंची लग्नगाठ (marraige) बांधली गेली. सारंग हे एक यशस्वी उद्योजक असून ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक म्हणून धुरा सांभाळतायत, तसेच ते क्रीडाप्रेमी आणि उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत.

या लग्नसोहळ्यास राजकीय, बिझनेस, कला, क्रीडा आणि बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींचीही हजेरी दिसून आली. पण एका चेहऱ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तो चेहरा म्हणजे कायनात धार. रेवती सुळेच्या लग्नात कायनात धार हिने थेट पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत ग्रँड एन्ट्री केली. त्यामुळे पुन्हा एकदा ‘कोण आहे ही कायनात धार?’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शरीराचा कोन आणि धार? (वडील धर कोण आहेत)

कायनात धार ही मूळची काश्मीरची असून, सध्या ती दिल्लीत वास्तव्यास आहे. पवार कुटुंबाशी तिचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. सुनेत्रा पवार जेव्हा काही काळापूर्वी काश्मीर दौऱ्यावर गेल्या होत्या, तेव्हा कायनात धार हिच्या घरीच त्यांचा शाही पाहुणचार करण्यात आला होता. तेव्हापासूनच कायनातची पवार कुटुंबाशी जवळीक वाढल्याचे सांगण्यात येते.

पार्थ पवारांसोबतची मैत्री आणि चर्चा

कायनात धार ही गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा स्पॉट झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार हे दोघेही मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन आणि पूजा करताना दिसले होते. त्यांचे मंदिरातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

पवार कुटुंबाच्या सुख-दुःखात सहभाग

कायनात केवळ आनंदाच्या प्रसंगातच नाही, तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत उभी राहिलेली दिसली. अजित पवार यांच्या निधनानंतर कायनात धार बारामतीत पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचली होती. इतकेच नव्हे तर, मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही तिने हजेरी लावली होती.

पार्थ पवारांसोबत अनेकदा दिसणे, पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे, तसेच रेवती सुळेच्या विवाह सोहळ्यातील उपस्थिती यामुळे कायनात धार सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, तिचे आणि पवार कुटुंबाचे नेमके संबंध काय आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकच रंग चढला आहे.

रेवतीच्या लग्नसोहळ्यात कोण कोण उपस्थित? (Revati Sule Wedding)

रेवती यांचे आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह जम्मू काश्मिरमधील नेते ओमर अब्दुल्ला, कन्निमोझी, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारही उपस्थित होते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने लग्नसोहळ्यात डान्स केल्यानंतर, बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सपत्नीक हजेरी लावली. तर, उद्योग क्षेत्रात जगभरात आपलं नाव कमावलेले देशातील दोन मोठे उद्योजकही सहकुटुंब लग्नसोहळ्यास हजर होते. मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांच्यासह गौतमी अदानी हेही लग्नाला उपस्थित होते.

हे ही वाचा –

रेवती सुळेंच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी; मोहन भागवत, राहुल गांधींसह दोन्ही ठाकरे कुटुंबीय, बॉलिवूड अन् उद्योगपती, पाहा यादी

Comments are closed.