सिंकदर शेख प्रकरणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचा मुलगा…
सिकंदर शेख यांच्यावर सुप्रिया सुळे : अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला (Sikandar Shaikh Arrested) पंजाब पोलिसांनी अटक केल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या या नामांकित पैलवानावर गंभीर आरोप लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. पंजाब पोलिसांच्या तपासानुसार, राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदर शेखचा संबंध असल्याचं समोर आलं असून, याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यानया पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh Arrested) यांच्यावरील कारवाई संदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आहे. तिथल्या डीजीसोबत देखील चर्चा झाली आहे. मी त्यांना विनंती केली आहे ते, आमचा मराठी मुलगा आहे. त्याला पारदर्शक चौकशी करून बेल मिळावा, ही आमची इच्छा आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली.
Supriya Sule on Jay Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कँडिडेट द्यायचं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न
राज्यात नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता असून, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज पत्रकार परिषदेत तारखा जाहीर करू शकतात. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे बारामती नगरपरिषदेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कँडिडेट द्यायचं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे,’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावर दिली आहे. जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांकडे आणि अजित पवारांच्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार यांच्या पराभवानंतर, जय पवार यांना थेट ग्राऊंड लेव्हलच्या राजकारणातून संधी देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
Supriya Sule : महादेव मुंडे प्रकरण आणि फलटण डॉक्टर प्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन झालेली नाही. दुसरे प्रकरण महादेव मुंडे प्रकरण आहे. तिथे 3 महिन्यपूर्वी एसआयटी स्थापन झाली आहे. त्यात देखील विशेष काही झालं नाही. आम्ही येत्या अधिवेशनात बजरंग सोनवणे आणि मी स्वत: जाऊन अमित शाह यांना भेटणार आहोत. अशी माहितीहे खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) यांनी दिली. त्यामुळे फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण आता दिल्ली दरबारी जाणार असून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. महादेव मुंडे खून प्रकरण आणि फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असून दोन्ही प्रकरणाचा आपण स्वतः प्रत्येक आठवड्याला फॉलप घेणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंni दिली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
			
											
Comments are closed.