रेवती आऊट, जान्हवी इन… सुप्रिया सुळेंकडून खास फोटो, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच

मुंबई : राष्ट्रवादीचे संस्थापक आणि खासदार शरद पवार यांची नात तर सुप्रिया सुळेंची (Supriya sule) कन्या रेवती सुळेचा काही दिवसांपूर्वीच विवाहसोहळा संपन्न झाला. मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर याठिकाणी रेवती आणि सारंग यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती दिसून आली. या लग्नसोहळ्यानंतर (Marriage) खासदार सुप्रिया सुळे सासूबाई झाल्या असून आता लवकरच त्यांच्याही घरी सूनबाई येणार की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, स्वत: सुप्रिया सुळेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेट्‍समुळे सुळेंच्या घरात पुन्हा लगीनघाई असल्याची चर्चा होत आहे.

पवारांच्या घरात सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे, कारण आधी युगेंद्र पवार, त्यानंतर जय पवार आणि आता पार्थ पवार यांचेही लग्न होत आहे. पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली असून लवकरच तेही लग्नबंधनात अडकणार आहेत. यंदाच्या वर्षात पवारांच्या पोरांनी मनावर घेतलंय, असे सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तर, नुकतेच 20 जून रोजी रेवती सुळेंचाही विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानंतर, पुन्हा एकदा सुळेंच्या घरात लग्नाची बोलणी सुरू झाली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण ठरले ते सुप्रिया सुळेंनी ठेवलेलं स्टेटस.

सुप्रिया सुळेंनी आपल्या व्हॉट्सअपला फोटो शेअर करत स्टेट्‍स ठेवलं आहे. त्यामध्ये, ‘Revati out, Janhavi in’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे, कन्या रेवतीची लग्न करुन पाठवणी केल्यानंतर आता सुळेंच्या कुटुंबात जान्हवी येतेय का? असा प्रश्न यानिमित्ताने अनेकांच्या मनात आला आहे. तसेच, जान्वही नेमकी कोण आहे? असाही प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर, जानव्ही ही सकाळ माध्यम समुहाचे प्रमुख अभिजीत पवार यांची कन्या आहे. जान्हवी ही सुप्रिया सुळेंची भाची आहे. रेवतीच लग्न झाल्यानंतर आज दिल्लीच्या घरी त्या आल्या आहेत. त्यामुळे, सुप्रिया सुळेंनी Revati out Janavi in अशी पोस्ट लिहिली आहे. मात्र, सुप्रिया सुळेंच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा सुळेंच्या घरात लग्नाची बोलणी सुरू झाली की काय, अशी चर्चा रंगली. दरम्यान, सुप्रिया सुळेंना एक मुलगा असून त्याचे नाव विजय सुळे असे आहे,  त्याने नुकतेच न्यूयॉर्क विद्यापीठातून (NYU) स्पोर्ट्स मॅनेजमेंट या विषयातून एमबीएची (MBA) पदवी पूर्ण केली आहे.

जान्हवीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अभिनेत्रीकडून कौतुक

जान्हवी ही AP Globale ग्रुप ऑफ कंपनीची डायरेक्टर असून अभिजीत पवार यांची कन्या आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सेलेना जेटलीने जान्हवीच्या व्यक्तिमत्वाबद्दल मत मांडलं होतं. मी एका विलक्षण, प्रभावी आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात होते. भविष्यकालीन दूरदर्शी नेतृत्व कसे असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे जान्हवी. सक्षम, आत्मविश्वासू आणि उद्दिष्टपूर्तीसाठी कटिबद्ध असलेली तरुणी म्हणजे जान्हवी. जागतिक दृष्टीकोन, आपल्या मूल्यांशी घट्ट जोडलेली आणि समाजात अर्थपूर्ण बदल घडवण्याच्या ध्येयाने प्रेरित अशी मुलगी म्हणजे जान्हवी, अशा शब्दात अभिनेत्रीने जान्हवीसोबतचे फोटो शेअर केले होते.

Comments are closed.