राष्ट्रवादीचा मारकुटा सूरज चव्हाण रात्री गुपचूप पोलिसांना शरण, रातोरात जामीनही मंज

लातूर: शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील अकरा फरार आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज चव्हाण फरार होता. मारहाण प्रकरणानंतर फरार असलेले सूरज चव्हाण पोलिसांना शरण आला आहे, सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांच्या ताब्यात होते. सुरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांना जामिन ही मंजूर झाला आहे. लातूर पोलिसांनी सुरज चव्हाण यांना पाठीशी घालत, कमालीची गुप्तता पाळली होती. सुरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाले नंतर पहाटे जमानत देखील मिळाली. या घटनेनं पुन्हा एकदा मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. रात्री सूरज चव्हाण पोलिस ठाण्यात दाखल झाले, त्यानंतर लगेचच जामीनाची प्रक्रिया झाली. जबाब नोंदवून बाहेर पडला, या घटनेनं शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

लातूरमध्ये (Latur) अखिल भारतीय छावा संघटना (Chava Sanghatana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. यानंतर छावा संघटनेनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कोण आहे सूरज चव्हाण?

1)  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सध्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
2)  सूरज चव्हाण हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जातात.
3) एकत्रित राष्ट्रवादीत महाराष्ट्र युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सूरज चव्हाण यांनी पार पाडली आहे.
4) सूरज  चव्हाण हे मुळचे लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळचे रहिवासी आहेत.
5)राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्या 10 मध्ये अजित पवारांसोबत जाणारा कार्यकर्ता म्हणजे सूरज  चव्हाण होते.
6)  2019 साली अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात महत्वाची भूमिका सूरज चव्हाण यांनी बजावली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूरमध्ये मोठा राडा झाला. विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना दादांच्या पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंसमोर पत्ते टाकले, त्यानंतर कार्यकर्ते भिडले

सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत त्यांनी निवेदन दिलं. त्याचवेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते टाकले. यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले. यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जोरदार मारलं. सूरज चव्हाण यांनी हाताच्या कोपराने, बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं दिसून येतंय.

आणखी वाचा

Comments are closed.