सूर्याच्या ‘टी 60 लाइफ’ने क्रिकेटविश्व क्लीन बोल्ड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानला 2026 चा टी20 विश्वचषक जिंकून देणारा ‘कॅप्टन कूल’ सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आयपीएलचा थरार सुरू असतानाच ‘मि. 360’ने एक्सवर टाकलेल्या एका गुगलीने चाहत्यांना क्लीन बोल्ड केलंय.

‘मित्रांनो, मी आता आणखी मोठय़ा प्रवासाला सुरुवात करतोय. आयुष्याच्या एका नव्या अध्यायात पाऊल ठेवतोय. एका वेगळ्या वेगात. यालाच म्हणतात ‘टी60लाइफ’ असं भावनिक ट्विट सूर्याने केलं आणि सोशल मीडियावर वादळ आलं.

हे ‘टी60लाइफ’ म्हणजे काय? निवृत्तीचे संकेत? राजकीय इनिंग? की बिझनेसचा नवा डाव? चाहत्यांच्या अंदाजांचा अक्षरशः पाऊस पडतोय. काही तासांतच हजारो कमेंट्स आणि शेअरने ट्विट व्हायरल झालेत. मुंबई इंडियन्सचा मॅचविनर आणि टीम इंडियाचा रनमशीन असलेल्या सूर्याच्या बॅटप्रमाणेच त्याचे हे ट्विटही सिक्सर ठरलेय. आता ‘स्काय’ पुढे काय घोषणा करतो याकडे संपूर्ण क्रिकेटविश्व डोळे लावून बसलेय.

Comments are closed.