पाकिस्तान नको… सूर्या स्पष्टचं बोलला, टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आम्हाला बदला घ्यायचाय


सूर्यकुमार यादव T20 विश्वचषक फायनल: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 च्या सुरुवातीला आयसीसी टी20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 8 मार्चला अंतिम सामना रंगणार आहे. या कार्यक्रमाला टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा तसेच सध्याचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होता. यावेळी सूर्यानं टीम इंडिया अंतिम सामन्यात कोणत्या संघाला पराभूत करण्यास आवडेल हे सांगितले. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी20 फॉर्मेटमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाशी ‘हिशेब’ चुकता करण्याची सूर्याची इच्छा

टी20 विश्वचषक 2026 चं फायनल सामना (जर पाकिस्तान पात्र ठरला नाही तर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. याच मैदानावर 2023 च्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यात झाला होता, ज्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या सामन्यात सूर्या खेळला होता पण केवळ 18 धावा करून बाद झाला होता.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सूर्यानं जेव्हा सांगितलं की, तो अंतिम सामन्यात कोणत्या संघाशी भिडायला आवडेल, तेव्हा त्यानं क्षणाचाही विलंब न करता ऑस्ट्रेलियाचं नाव घेतलं. सूर्या म्हणाला, “अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियम… आणि ऑस्ट्रेलिया!” मागील टी20 विश्वचषकातील सुपर-8 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला होता.

टीम इंडिया 15 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध

टी20 विश्वचषक 2026 साठी भारताचा समावेश ग्रुप-अ मध्ये करण्यात आला आहे. या गटात भारतासोबत पाकिस्तान, यूएसए, नामिबिया आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे.

भारताची ग्रुप-स्टेज सामने :

  • 7 फेब्रुवारी: भारत vs यूएसए
  • फेब्रुवारी: भारत विरुद्ध नामिबिया
  • 15 फेब्रुवारी: भारत vs पाकिस्तान (आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो)
  • 18 फेब्रुवारी: भारत vs नेदरलॅंड्स (अहमदाबाद)

हे सर्व सामने खेळून भारत सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

हे ही वाचा –

Rohit Sharma Brand Ambassador : रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2026 ब्रँड ॲम्बेसेडर; आयसीसीकडून किती मिळणार पगार?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.