सुशील केडियाचा माज उतरला, चूक झाली, माफी मागितली, राज ठाकरेंचंही कौतुक VIDEO
राज ठाकरे वर सुशील केडिया: “राज ठाकरे, तुम्ही लक्षात घ्या की मुंबईत 30 वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही, आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करतात, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही” असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना आव्हान देणारा उद्योजक सुशील केडिया आता नरमला आहे. राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर मराठी माणसांनी सुशील केडियाला खळखट्याकने प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर सुशील केडिया याने राज ठाकरेंची माफी मागितली आहे.
सुशील केडिया काय काय म्हणाला?
सुशील केडिया म्हणाला, “माझं ट्वीट चुकीच्या मानसिक अवस्थेत, दबावाखाली आणि तणावात लिहिलं गेलं होतं… आणि आता त्याचा विपर्यास आणि चुकीचा अर्थ लावला जात आहे. काही लोकांना वाद निर्माण करून त्यातून फायदाच मिळवायचा आहे. मराठी न कळणाऱ्या लोकांवर झालेल्या हिंसाचारामुळे मी मानसिक तणावाखाली होतो, आणि त्यामुळे मी अति प्रतिक्रिया दिली. आता मला जाणवतंय की ती प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी होती.
पुढे बोलताना सुशील केडिया म्हणाला, तणावाखाली आणि मानसिकता ठीक नसताना मी ट्विट केलं. आता वादातून लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून त्याचा गैरअर्थ काढला जातोय..मराठी न येणाऱ्यांविरोधातला हिंसाचार पाहून मानसिक दबावाखाली येऊन मी ओव्हररिअॅक्ट केलं. माझं ओव्हररि अॅक्शन मागे घ्यायला हवं, याची मला जाणीव झाली. 30 वर्षांपेक्षा जास्त वर्षं मुंबईत राहूनही मला स्थानिक मराठी लोकांसारखं अस्खलित मराठी बोलता येत नाही हे सत्य आहे. सातपेक्षा जास्त भारतीय भाषा मी शिकल्यात. सततच्या भीतीदायक वातावरणात एखादा शब्द इकडचा तिकडं होण्याची शक्यता असते त्यावरून काही लोक टार्गेट करण्याची भीती असते. राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेतलेल्या ठाम भूमिकेचं मी स्वागत करतो. मी राज ठाकरेंचा प्रशंसक आहे. ओव्हररिअॅक्ट करताना माझ्याकडून चूक झाली. मराठी शिकण्यासाठी भीतीऐवजी प्रोत्साहन द्या. माझी चूक स्वीकारतो आणि माफी मागतो.
मी विनंती @Rajthackeray माझ्या नम्र सबमिशनचा विचार करण्यासाठी जी. pic.twitter.com/i8zgszgntw
– सुशील केडिया (@सुशिलकेडिया) 5 जुलै, 2025
खरं म्हणजे, मुंबईत 30 वर्षं राहूनही, मराठी मातृभाषिकांना जशी प्रवाही आणि नैसर्गिकपणे मराठी भाषा बोलता येते, तशी भाषा आम्ही बोलू शरत नाहीत. कोणतीही गैरसमज किंवा लज्जास्पद परिस्थिती टाळण्यासाठी, मराठी भाषा मी मुख्यतः अनौपचारिक किंवा जवळच्या माणसांसोबतच वापरली आहे. मी ज्या इतर सात भारतीय भाषा शिकल्या, त्यात असा अनुभव कधी आला नाही. पण मराठीच्या बाबतीत, वारंवार निर्माण होणारं भीतीचं वातावरण मनात नैसर्गिक संकोच निर्माण करतं. ‘काही चूक उच्चारलं, एखादं वाक्य किंवा शब्द चुकीच्या संदर्भात वापरला, आणि कुणी त्याचा विपर्यास करून तो मुद्दाम मोठा वाद करून बसलं’ ही भीती कायम वाटत राहते.” असंही केडिया यावेळी बोलताना म्हणाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.