दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? सुषमा अंधारेंचा रुपाली चा
रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणी सुषमा अंधारे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यासाठी त्यांना समन्सही पाठवण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारे (Namkarna Aware) यांच्यावर देखील सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, निव्वळ हुल्डबाजी करायची म्हणून शिंदेच्या कार्यकर्त्यांनी टीका करणाऱ्या पोस्ट केल्या. पण आम्ही केसरकारांना उघडं केलं आहे. केसरकर म्हणतात मी एकटा गेलो नाही. शिंदेसाहेबांसोबत गेलो होतो. म्हणजे शिंदे आणि खरात यांचे थेट संबंध आहे, असं म्हणायचं आहे का? नामकर्ण आवारे यातील महत्वाची कडी आहे. तो भाजप आघाडीचा प्रमुख होता. जगदंब पतसंस्थेचा आवारे चेअरमन होता. खरात देखील त्या संस्थेत होता. शिवनिका ट्रस्टवर देखील आवारे होता. खरात आणि आवारे यांचे व्यावसायिक संबंध आहेत, असा आरोप त्यांनी केला.
Sushma Andhare on Namkarna Aware: नामकर्ण आवारे अन् अशोक खरात सारखेच पापाचे भागीदार
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, आवारे याने अनेक उद्योजकांना खरातकडे हात दाखवावे लावले. पुस्तक लिहून आवरे यांनी खरातच्या कथा लिहिल्या. बुवाबाजी वाढवण्याचे काम आवारे यांनी केले. मदिरांचा प्रचार केला व स्वयंभू करण्याचं काम आवारे यांनी केलं. राजकीय नेत्यांना देखील त्यानेच मंदिरात आणलं. नामकर्ण आवारे आणि खरातचे संबंध एक वर्षापासून बिघडले. नामकर्ण आवारे सगळ्यांना सांगतोय की, एक वर्षापासून माझा आणि त्याचा संबंध नाही.पण, संबंध नाही तर नामकर्ण आवारे याने तेव्हाच खरात हा भोंदू आहे. खरात हा चुकीचं वाकत आहे. खरात बायकांचं शोषण करत आहे ही गोष्ट पुढे का आणली नाही? आवारे आणि खरात हे सारखेच पापाचे भागीदार आहेत, असे देखील त्यांनी म्हटले.
Sushma Andhare on Rupali Chakankar: हे सर्व गुन्हेगार ठरतात
खरातची जागा आणि आवाराचे दुकान अशी परिस्थिती आहे. सिन्नर गावातलं हार्डवेअर चे दुकान आजही आवारेचं दुकान आहे आणि ती जागा खरातची आहे. दोघांचेही आजही आर्थिक संबंध आहेत. 2018 साली जयकुमार रावल यांच्या कार्यकाळात 31 मार्च 2018 रोजी खरातच्या मंदिराला ‘क’ वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. अशोक खरातला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही. तरीदेखील त्याचे प्रस्थ वाढवण्यासाठी नामकर्ण आवारे, रुपाली चाकणकर हे प्रयत्न करत होते. त्यामुळे हे सर्व गुन्हेगार ठरतात. रूपाली चाकणकरांना सर्व परिस्थिती माहिती असताना त्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घातले, अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली.
Sushma Andhare on Rupali Chakankar: तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का?
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, एसआयटी अजूनही रूपाली चाकणकरांना चौकशीला का बोलवत नाही? चाकणकरांना समान पाठवले, असे समजले. परंतु त्यांनी महिला असल्यामुळे मी प्रवास करू शकत नाही, असे म्हटले. मग तुम्ही दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? आयोगाची सर्व महत्त्वाची कामे सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जायच्या, तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसे नव्हते का? रूपाली चाकणकर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर हा एसआयटीचा अवमान आहे. हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे, असा हल्लाबोल त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.