सुषमा अंधारेंनी दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचा फोटो अल्बमच उघडला, खरातसोबतचे हादरवणारे फोटो दाख

नाशिक:  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती एकामागून एक समोर येत आहेत. यादरम्यानच आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) , यांनी नाशिकच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीचे आणि बैठकांचे फोटो दाखवले. सुषमा अंधारे यांनी भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचे अशोक खरातसोबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांनी असा सवाल केला की, “हा भस्मासूर (अशोक खरात) कोणी पोसला? त्याला पैसा-अडका कोणी दिला?”. हेमंत गोडसे यांच्या एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अशोक खरात पुजारी म्हणून उपस्थित असल्याचे फोटो त्यांनी दाखवले.

सिन्नर एमआयडीसी आणि शालेय शिक्षण खात्याचा संबंध

अंधारे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे सिन्नर एमआयडीसीशी संबंधित एका कार्यक्रमातील फोटो दाखवले. शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? आणि तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या बॅनरवर ‘सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित’ असे लिहिले असून, तिथे कॅबिनेट मंत्री शांत उभे आहेत आणि रुपाली चाकणकर यांचा सत्कार खरातच्या उपस्थितीत होत आहे, यावर त्यांनी आक्षेप घेतला. रुपाली चाकणकर यांनी “मी खरातला केवळ सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते” असे स्पष्टीकरण दिले होते. यावर अंधारे यांनी प्रश्न विचारला की, जर सामाजिक उपक्रम होते तर तिथे एमआयडीसीचा पूर्ण स्टाफ का होता? अशा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केला आहे. खरात आणि चाकणकर यांच्यातील संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे. दीपक केसरकर आणि चाकणकर यांचे फोन रेकॉर्ड अर्थिक खाते चेक करा. आर्थिक गुन्हे शाखेला भेटणार आहे. चौधरी जे तटकरे सोबत अनेक व्यवहारत ते कोकणात चाकणकर यांच्यां सोबत आहेत. साडेचारशे पाचशे कोटीचा प्रोजेक्ट आहे, येवढी ताकद कुठून येते, असा सवालही अंधारेंनी केला आहे.

SIT कडे अंधारेंची मोठी मागणी

सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT (विशेष तपास पथक) कडे दीपक केसरकर यांची चौकशी व्हावी, असे अधिकृत पत्र दिले आहे. “माझ्या नेत्यावर (उद्धव ठाकरे) ताज हॉटेलमध्ये बसल्याचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आता या फोटोंचे उत्तर द्यावे,” असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

पिण्याचे पाणी देणे ही माणुसकी

सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले की, खरातच्या ‘शिविका ट्रस्ट’ला पाणी देण्याचा निर्णय हा २०२० मधील मिरगावच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार झाला होता  पिण्याचे पाणी देणे ही माणुसकी आहे. या कामासाठी रुपाली चाकणकर यांनी शिफारस केली होती, ज्यानुसार प्रति व्यक्ती ३० लिटर पाणी देण्याचे ठरले होते. हा निर्णय तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अखत्यारीत होता, यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट संबंध नव्हता, असंही अंधारेंनी म्हटलं आहे.

अंधारे यांनी खळबळजनक आरोप केला की, अशोक खरातला २०१२ मध्ये बंदुकीचा परवाना मिळाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २०२४ मध्ये या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरण (Renewal) करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. जर दीड वर्षांपासून खरातची कृत्ये माहिती होती, तर फडणवीस सरकारने २०२४ मध्ये त्याच्या बंदुकीच्या परवान्याचे नूतनीकरण का केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते जयकुमार रावल यांनी खरातला मोठा निधी दिला असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. यावर सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. गेल्या साडेसात-आठ वर्षांपासून (अडीच वर्षांचा काळ वगळता) गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. मग त्यांनी वेळीच खरातला चाप का लावला नाही? असा टोला त्यांनी लगावला. सुषमा अंधारे यांनी पुराव्यांसह (जीआर आणि परवान्याची कागदपत्रे) असा दावा केला आहे की, खरातला पाणी देण्यापेक्षा त्याला बंदुकीचा परवाना देणे आणि त्याचे नूतनीकरण करणे ही गंभीर बाब असून यासाठी सध्याचे सरकार जबाबदार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.