गुनाट गावात लपला, दत्ता गाडे 3 दिवसांत सापडला; 1 लाखांचं बक्षीस कोणाला?, गावकऱ्यांचा मोठा निर्ण

स्वारगेट बस डेपो क्राइम न्यूज: स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (25 फेब्रुवारीला) 26 वर्षीय युवतीवर बलात्कार (Swargate Bus Depot Crime News) करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) बलात्काराच्या घटनेनंतर त्याच्या गुनाट या गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी पोलिसांची अनेक पथकं गुनाट गावात पोहोचली होती. यावेळी पोलिसांनी दत्ता गाडेच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर तो गावातच असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर दत्तात्रय गाडेला मध्यरात्री शेतातून अटक केली.

दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांना 1 लाखांचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं. दत्तात्रय गाडेला अटक करण्यात अनेकांची मदत झाली. गुनाट गावात आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांचीही पोलिसांना मोठी मदत झाली. त्यामुळे आता पोलिसांनी जाहीर केलेलं एक लाखाचं बक्षीस कोणाला मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेला अटक केल्यानंतर गुनाट गावात बक्षीसावरुन दोन मतप्रवाह असल्याचं दिसत आहे.

दत्ता गाडेला अटक केल्यानंतर गुनाट गावात वाद-

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पकडून देण्यात गुनाट या गावातील लोकांनी पोलीसांना मदत केली. त्यामुळे दत्ता गाडेची माहिती देणाऱ्या गावातील लोकांना एक लाख रूपयांचे बक्षिस देण्याचे पुणे पोलीसांनी जाहीर केले. मात्र गुनाट गावातील ग्रामस्थांनी बक्षिसाची ही रक्कम नाकारायच ठरवलं आहे. कारण या प्रकरणामुळे गावाची बदनामी झाल्याच ग्रामस्थांच मत आहे. दत्ता गाडे दोषी आहे की नाही हे पोलीसांच्या तपासात समोर येईल. त्यामुळे पोलीसांना पूर्ण सहकार्य करायचं असं गावकऱ्यांनी ठरवलंय. मात्र बक्षीसाची रक्कम नको असं ग्रामस्थ म्हणतायत. त्याचबरोबर बक्षिसाची रक्कम स्वीकारायचे ठरले तरी ती रक्कम गावाच्या विकास निधीसाठी वापरण्यात यावी, असंही काही ग्रामस्थांचं मत आहे.

दत्तात्रय गाडे तीन दिवस गुनाटमध्येच-

25 फेब्रुवारी रोजी पहाटे दत्तात्रय गाडेने स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट या गावी गेला होता अशी माहिती आहे. पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या अटकेच्या कारवाईत गुनाट गावच्या नागरिकांनी यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली असल्याचं सांगितलं. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला जिथून अटक केली तिथं काही कपडे आणि गोधडी देखील आढळून आली होती.

संबंधित बातमी:

Swargate Bus Depot News: दत्तात्रय गाडेने सीटवर ढकललं, गळा दाबला; पीडित तरुणी म्हणाली, जे करायचंय कर, पण…; बसमध्ये नेमकं काय घडलं?

https://www.youtube.com/watch?v=4kn7fh0stbo

अधिक पाहा..

Comments are closed.