स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण! तरुणीचा आवाज बसबाहेर गेला नाही कारण…महत्वाची अपडेट समोर
पुणे : पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी (Swargate sexual assault case) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तरुणीने आरोपीला प्रतिकार केला. मात्र, बस वातानुकूलित असल्यानं तरुणीचा आवाज बाहेर गेला नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. बसमधून आवाज बाहेर येतो किंवा नाही, हे पुणे पोलिसांनी (Pune Police) शास्त्रोक्त पडताळणी केली आहे. तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी बसमध्ये प्रत्यक्ष ध्वनी प्रयोग केला आहे.
पोलिसांसह ध्वनी तंत्रज्ञांना घेऊन स्वारगेट एस टी स्टँडमध्ये जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात 25 फेब्रुवारीला 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीने आरडाओरडा केला नाही का? तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही का? असे प्रश्न उपस्थित केले गेले होते. आरोपीविरोधात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांनी पडताळणी केली आहे. या गुन्ह्यात दत्तात्रय रामदास गाडे याला अटक करण्यात आली असून सध्या तो येरवडा कारागृहात आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात 25 फेब्रुवारीला पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. पुण्यात नोकरी करणारी तरुणी फलटन येथे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे आगारात आली होती. एसटीची वाट पाहत असताना आरोपी दत्तात्रय गाडे हा तिथेच घुटमळत होता. तरुणीला ताई अशी हाक मारत आरोपीने तिचा विश्वास संपादन करत संवाद सुरू केला. ती कुठे जात आहे, याची माहिती घेऊन तिला फलटणला जात असलेली बस दुसरीकडे उभी असल्याचे सांगून शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत होते. या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली होती.तर या प्रकरणातील आरोपी शिरूर तालुक्यातील त्याच्या गावातील एका ऊसाच्या शेतात लपून बसला होता. हा आरोपी स्वत:ला कंडक्टर भासवून पीडित महिलेला ताई म्हणून तिचा विश्वास मिळवला होता. आरोपीनेच ती बस दाखवली होती तसेच बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं भासवलं होतं. मात्र, बस पूर्णपणे रिकामी होती. फिर्यादी तरूणीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. मला बाहेर सोडा, अशीही विनंती तिने केली होती. मात्र, आरोपीने तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर तो पळून गेला. पीडितेने नंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल केला.हा आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. आजवर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Swarget Depo Crime News: स्वारगेट बलात्कार प्रकरणी विधिमंडळात कारवाईचे उत्तर; मोठ्या अधिकाऱ्यांच्या केल्या तडकाफडकी बदल्या
अधिक पाहा..
Comments are closed.