स्वतंत्र भारद्वाज यांनी 3 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
जंतर-मंतर येथे मारहाण प्रकरणी आरोपी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनांदरम्यान जंतर-मंतर येथे एका अल्पवयीन मुलीच्या पित्याला झालेल्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी स्वतंत्र भारद्वाज याला पतियाळा हाउस न्यायालयाने 3 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरव प्रताप सिंह लालर यांनी सुनावणीनंतर हा आदेश जारी केला. जंतर-मंतरवर निदर्शनादरम्यान मारहाण आणि एससी/एसटी अॅक्ट आणि पॉक्सोशी निगडित गुन्हे स्वतंत्र विरोधात नेंद आहेत.
यापूर्वी न्यायालयाने आक्षेपार्ह वक्तव्य करणे आणि जंतर-मंतरवर एका निदर्शकाच्या पित्याला मारहाण केल्याप्रकरणी स्वतंत्र भारद्वाजला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
स्वतंत्र भारद्वाज याला पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पतियाळा हाउस न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्याच्या विरोधात अल्पवयीनाचा पाठलाग करणे, धमकाविणे आणि महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचविण्यासारखे आरोप आहेत. एका पॉडकास्टचा व्हिडिओ समोर आल्यावर स्वतंत्र भारद्वाजशी संबंधित प्रकरण तापले होते. सीजेपी आणि काँग्रेसने याप्रकरणी निदर्शने केली होती. तर अल्पवयीनाच्या पित्याच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी एफआयआर नोंदविला होता.
Comments are closed.