शाहरुख खानने संपु्र्ण कुटुंबासोबत साजरा केला गणेशोत्सव, म्हणाले आज करणार बाप्पाचे विसर्जन – Tezzbuzz

शाहरुख खानने अनेकदा सांगितले आहे की त्याचा परिवार अनेक प्रकारचे, धर्माचे सण एकत्र साजरे करतात. दिवीळी असो किंवा ईद ते नेहमीच परिवारासोबत एकत्र येउन सण साजरा करतात. तसेच अभिनेता शाहरुख खान हा दर चतुर्थीचा उपवास हि करतो. तसेच तो अलीकडील एका मुलाखतीत म्हणाला की, आम्ही दर वर्षी गणेश चतुर्थीला बाप्पाचे घरी स्वागत करतो. आणि कुंटुब आणि मित्रासोबत हा सण साजरा करतो. तसेच त्याने पुढे म्हणले की, पत्नी गौरी पुजा करते आणि परिवार आणि कुंटुब एकत्र वेळ घालवण्यासाठी जमत असतो.

शाहरुखने xवर सर्वाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि पोस्ट मध्ये लिहले आहे की, सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बप्पा तुमच्या आयुष्यात आंनद घेऊन येवो. मित्रांसोबत आनंद वाटुन घेतल्याने तो आनंद अधिक होतो. चला तर मग हा आनंद वाटुन घेउयात आणि मजा करुयात.

अभिनेता ही पोस्ट शेअर करताच चाहत्यानी त्याला विविध प्रश्न विचारले, बाप्पा बाबत एका चाहत्याने प्रश्न विचारले असता शाहरुखने उत्तर देत म्हणले की, माझी पत्नी आरती करते. त्यानंतर आणि प्रार्थना करतो. आणि आज आम्ही विसर्जन करणार आहोत.

अभिनेत्याच्या कामाबाबत पाहयचे झाल्यास सध्या तो किंग वर काम करत आहे. तसेच हा चित्रपट 24 डिसंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून, यात शाहरुख (Shahrukh)खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा

अरिजित सिंग-श्रेया घोषालच्या सुरांनी सजलं जय जय राम, रणबीर कपुरच्या रामायण मधील पहिलं गाणं रिलीज

Comments are closed.