W, W, W, W…पदार्पण असावं तर असं! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जमशेद आलमने उडवली फलंदाजांची भंबेरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेच्या 23 वर्षांच्या जमशेद आलमने स्वप्नवत पदार्पण करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सौराष्ट्रविरुद्ध त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीच सोनं करत फलंदाजांना आपल्या गोलंदाजीचा दणका दाखवून दिला. त्याने एक दोन नव्हे तर पाच विकेट घेत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला आणि ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला.

डेली कॉलेज ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात जमशेद आलमने आपल्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विश्वराज जडेजाला शून्यावर बाद करत धक्का दिला. त्यानंतर चौथ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर हार्विक देसाई, चौथ्या चेंडूवर प्रेरक मांकड आणि पाचव्या चेंडूवर रुचित अहिर यांना बाद करून त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली, तर पुढच्याच चेंडूवर समर गज्जरला शून्यावर बाद करत सलग चार विकेटचा विक्रम नोंदवला. या विक्रमासह जमशेद आलम टी-20 क्रिकेटमध्ये सलग चार विकेट घेणारा चौथा हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. त्याने सहाव्या षटकात सिद्धांत राणालाही पायचीत करून 4 षटकांत 38 धावांत 5 विकेट घेतल्या.

Comments are closed.