मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशी, भारत-पाकिस्तान कधी?


नवी दिल्ली : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने गत 2024 चा T-20 विश्वचषक (T-20) उंचावत जगभरातील क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम केला. क्रिकेटचाहत्यांची पंढरी असलेल्या भारतात निवडणुकांप्रमाणेच क्रिकेट स्पर्धांची उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे, गतवर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर आता भारतीय संघाला आणि क्रिकेट चाहत्यांना आगामी टी-20 विश्वचषकाची उत्कंठा लागून राहिली आहे. विशेष म्हणजे यंदाचा टी-20 वर्ल्डकप भारतात होणार असून 7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाच्या 10 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. तर, भारत पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 15 फेब्रुवारी होत आहे. तर, अंतिम सामना 8 मार्च 2026 रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

आयसीसीचे अध्यक्ष जय शहा तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. यंदाही विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघांचा असणार समावेश असणार आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकाचं आयोजन भारत आणि श्रीलंकेत असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच हा विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येत आहे. मुंबईसह,दिल्ली,चेन्नई, कोलकत्ता आणि अहमदाबाद येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणच्या मैदानावर देखील टी-20 सामने खेळवले जातील. विशेष म्हणजे रोहित शर्मा टी-20 विश्वचषकाचा ब्रँड एम्बॅसिडर असणार आहे. रोहितने जून 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे.

टी-20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधेच भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा एकाच ग्रुपमध्ये समावेश असून ग्रुप ‘ए’ मध्ये भारत आणि पाकिस्तानसह, अमेरिका नेदरलँड्स आणि नामिबियाचा समावेश आहे.

सामन्याचं वेळापत्रक

७ फेब्रुवारी भारत विरुद्ध अमेरिका (मुंबई वानखेडे)

१५ फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान

नामिबिया विरुद्ध भारत (१२ मार्चनवी दिल्ली)

१८ फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 4 ग्रुप

अ गट- भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड.
ग्रुप B – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान.
ग्रुप C- इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ.
ग्रुप D – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅनडा.

हेही वाचा

टीम इंडियाने चौथ्या दिवशीच पराभव मान्य केला?; आर.अश्विन संतापला, ऋषभ पंतचा तो फोटो शेअर करत काय काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.