नितेश राणेंना माझं समर्थन, महाराष्ट्रातील सर्व मदरसे उद्ध्वस्त करा; टी. राजा सिंह यांचे वादग्रस

टी राजा सिंह: आपल्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह (T Raja Singh) यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विधानांचे समर्थन करत त्यांनी राज्यातील अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची आणि औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची मागणी थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

T Raja Singh: मदरशांवर बुलडोझर चालवण्याची मागणी

टी. राजा सिंह म्हणाले की, मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सगळे मदरसे बंद करा. मदरशांमध्ये देश विघातक शिक्षण दिले जाते. असे मदरसे बंद करा. नितेश राणे यांना माझं निवेदन आहे की, अनधिकृत मदरसे बंद करण्यापेक्षा उद्ध्वस्त करा. आपल्या महाराष्ट्रात बुलडोजरचा नियम लागू झाला आहे. जर मदरसे बंद केले तर पुन्हा चालू होईल, त्यामुळे अनधिकृत मदरशावर बुलडोजर चालवण्याची गरज आहे. दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब अशाच मदरशातून तयार झालेत. मदरशामध्ये शिकवलं जाते की, हिंदूंची हत्या करा. नितेश राणेंना माझे निवेदन आहे की, तुम्ही बोललेल्या वक्तव्याची अंमलबजावणी करा, असे त्यांनी म्हटले.

T Raja Singh: औरंगजेबची कबर उखडा आणि शौचालय बांधा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्हाला संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर हटवण्यासाठी भीती वाटतं आहे का? असा सवाल देखील टी राजा सिंह यांनी उपस्थित केला. तुम्हाला वाटते की, मतदान मिळणार नाही. ते तुम्हाला मतदान करणार नाही, हे लिहून घ्या. मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की, महाराष्ट्राच्या हिंदूंना वाटतंय औरंगजेबची कबर उखडून तिथे शौचालय बांधा. औरंग्याची कबर महाराष्ट्रासाठी नको आहे. माझ्या संभाजीराजाला हळहळ करून मारलं. ती कबर उखडवण्यासाठी मावळे हवे असतील तर लाखोंच्या संख्येने येऊ, असे देखील टी राजा सिंह म्हणाले.

T Raja Singh: प्रत्येक घरात पाच बंदुका ठेवा

टी. राजा सिंह पुढे म्हणाले की, घरात शस्त्र ठेवा. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे. बाहेर काढून हल्ला केला तर तो वेगळा विषय आहे. जर युद्ध झालं, शस्त्र नसतील तर, तुम्ही काय करणार? कस लढणार? धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल तिथे आम्ही देऊ. एक-एक घरात पाच-पाच बंदुका असल्या पाहिजेत. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार आपल्याकडे राहिले पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

पुढची 25 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले

आणखी वाचा

Comments are closed.