संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, संजूची अनोखी कामगिरी

मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर आणि विकेटकीपर संजू सॅमसन यानं सलग दुसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. संजू सॅमसन यानं इंग्लंड विरुद्द 42 बॉलमध्ये 89  धावा केल्या. संजूनं आजच्या डावात 7 षटकार आणि 8 चौकार मारले. संजूनं आजच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा विक्रम मोडला. एका टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर नोंदवला गेला आहे. संजू सॅमसन यानं 4 सामन्यात 16 षटकार मारले. रोहित शर्मानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 8 सामन्यात 15 षटकार मारले होते. रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

संजू सॅमसन टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये षटकार मारणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलन आहे. एलन यानं  8 सामन्यात 20 षटकार मारले आहेत. एलन यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 33 बॉलमध्ये शतक केलं होतं. यामध्ये त्यानं  10 चौकार आणि 8 षटकार मारले. टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक फिन एलन यानं केलं आहे. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला 9 विकेटनं पराभूत केलं आहे. फिन एलन याच्यानंतर षटकारांच्या यादीत शिमरोन हेटमायर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 7 मॅचमध्ये 19 षटकार मारले आहेत. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान यानं 7 मॅचमध्ये 18 षटकार मारले आहेत.

T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज

16 – संजू सॅमसन (2026)
१५ – रोहित शर्मा (२०२४)
१५ – शिवम दुबे (२०२६)
14 – इशान किशन (2026)
14 – हार्दिक पांड्या (2026)
12 – युवराज सिंग (2007)
11 – टिळक वर्मा (2026)

भारत इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत

संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 7 बाद 253 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनला इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक यानं 15 धावांवर असताना जीवदान दिलं होतं.  संजू सॅमसन यानं 89, इशान किशन यानं 18 बॉलमध्ये 39 धावा केल्या. संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी केली.  शिवम दुबेनं 25 बॉलमध्ये 45, हार्दिक पांड्यानं 12 बॉलमध्ये 27 धावा केल्या. तिलक वर्मानं 7 बॉलमध्ये 21  धावा केल्या. भारतानं आजच्या डावात 19 षटकार मारले. इंग्लंडच्या संघानं 20 ओव्हरमध्ये 7 बाद 246  धावा केल्या आणि भारतानं 7  धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.