भारतानं इंग्लंडच्या ‘त्या’ खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्करांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला
सुनील गावस्कर मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. तर, उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी 20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील लढ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाचे महान खेळाडू माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. इंग्लंडच्या संघातील एका खेळाडूपासून भारतानं सावध राहावं, असा सल्ला त्यांनी सूर्या ब्रिगेडला दिला आहे.
Team India : सुनील गावस्करांचा भारताला सल्ला
भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी होणार आहे. या मॅचपूर्वी सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या विल जॅक्सपासून सावध राहण्याचा सल्ला टीम इंडियाला दिला आहे. विल जॅक्सनं या टी 20 वर्ल्ड कपमध्ये चारवेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकल्याचं देखील त्यांनी सांगितलं. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात संजू सॅमसनची कामगिरी देखील महत्त्वाची ठरणार असल्याचं गावस्कर यांनी म्हटलं.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की विल जॅक्स हा भारतासाठी सर्वात मोठा धोकादायक खेळाडू आहे. विल जॅक्स यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 191 धावा केल्या असून त्याच्या नावावर एक अर्थशतक आहे.तर, सात मॅचेसमध्ये विल जॅक्सनं 7 विकेट घेतल्या आहे. विल जॅक्सनच्या धडाकेबाज कामगिरीमुळं इंग्लंड सुपर 8 मध्ये अजिंक्य राहिले आहेत.
संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या त्याचा कसा सामना करतात ते पाहावं लागेल. भारताच्या शिवम दुबे प्रमाणं विल जॅक्स इंग्लंडसाठी चांगली कामगिरी करतो, असंही गावस्कर म्हणाले. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं गावस्कर यांनी म्हटलं.
वानखेडे स्टेडियमवर भारतानं 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात जिंकला होता. तर, उपांत्य फेरीचा विचार करता भारतानं या मैदानावर दोन वेळा सामने गमावले आहेत. इंग्लंड विरुद्ध 1987 मध्ये आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा पराभवा झाला होता.
सुनील गावस्कर यांनी टीम इंडियानं वानखेडे मैदानावरील जुन्या कामगिरीबाबत दडपण घेऊ नये. भारतीय संघाकडे अहमबादमध्ये अंतिम सामना खेळण्याची क्षमता आहे, असं देखील गावस्कर म्हणाले.
भारत आणि इंग्लंड टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दोन वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये एकदा इंग्लंडनं विजय मिळवला तर भारतानं एकदा विजय मिळवला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड 5 वेळा आमने सामने आले आहेत. तीनवेळा भारतानं विजय मिळवला तर दोन वेळा इंग्लंडवर विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 29 वेळा आमने सामने आले आहेत. भारताने 17 वेळा विजय मिळवला तर इंग्लंडने 12 वेळा विजय मिळवला आहे.
भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
आणखी वाचा
Comments are closed.