फक्त 100 रुपयांत स्टेडियममध्ये जाऊन पाहा शकता सामने; तिकिटे कुठे अन् कशी बुक करायची? जाणून घ्या
T20 विश्वचषक 2026 तिकिटांची किंमत जाणून घ्या ऑनलाइन कुठे खरेदी करायची : टी20 विश्वचषक 2026 च्या तिकिटांची विक्री गुरुवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही ठिकाणांसाठी किमान किंमत फक्त 100 रुपये किंवा 1000 श्रीलंकन रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आपल्या प्लॅटफॉर्मवर टी20 विश्वचषकाच्या 10व्या चरणातील तिकिटविक्रीची घोषणा केली असून, 20 संघांचा हा महासंग्राम आठ ठिकाणी खेळवला जाणार आहे.
भारतामध्ये अहमदाबाद, चेन्नई, नवी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता ही शहरे सामन्यांचे यजमान असतील, तर श्रीलंकेत कोलंबोमधील दोन मैदानं आणि कँडी येथील दोन स्थळांचा समावेश असेल. गतविजेता भारत पहिल्याच दिवशी होणाऱ्या तीन सामन्यांपैकी एका सामन्यात अमेरिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
𝗧𝗛𝗘 𝗧𝗜𝗖𝗞𝗘𝗧𝗦 𝗔𝗥𝗘 𝗢𝗨𝗧 🎟️
ऐतिहासिक कमी एंट्री-लेव्हल किमतींवर, ICC पुरुषांमध्ये जगातील सर्वोत्तम कामगिरीचे साक्षीदार व्हा #T20WorldCup 2026 भारत आणि श्रीलंकेत ➡️ https://t.co/MSLEQzcObb pic.twitter.com/iMBPdpixMf
— ICC (@ICC) 11 डिसेंबर 2025
100 रुपयांत वर्ल्ड कप पाहण्याची संधी
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “फक्त 100 रुपये आणि 1000 श्रीलंकन रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकिटांमुळे किफायतशीर दर हा आमच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. लाखो चाहत्यांना या जागतिक क्रिकेट महोत्सवाचा भाग बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. 20 संघ आणि 55 सामन्यांचा 2026 चा विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक टी20 विश्वचषक ठरेल.”
बीसीसीआयचे सचिव काय म्हणाले?
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “फक्त 100 रुपयांपासून तिकिटांची सुरुवात झाल्याने टी20 विश्वचषक 2026 विषयीचा उत्साह प्रचंड वाढला आहे. आम्ही प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा सामना पाहण्याचा अनुभव देण्यास कटिबद्ध आहोत.”
आयसीसी पुरुषांसाठी तिकिटे #T20WorldCup 2026 आता लाइव्ह आहेत! 🥳
साठी जल्लोष #TeamIndia स्टँडवरून आणि आताच तुमची तिकिटे मिळवा 👉 https://t.co/7bwtnrDDYD pic.twitter.com/wYjtN4cLVO
— BCCI (@BCCI) 11 डिसेंबर 2025
गुरुवारपासून तिकिटांची उपलब्धता
आयसीसीचे CEO संजोग गुप्ता यांनी सांगितले, “तिकिटविक्रीचा पहिला टप्पा हा आतापर्यंतचा सर्वांत सुलभ आणि जागतिक पातळीवरील आयसीसी स्पर्धा आयोजित करण्याच्या आमच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमचा उद्देश स्पष्ट आहे, प्रत्येक चाहत्याला, त्याची पार्श्वभूमी अथवा आर्थिक स्थिती काहीही असो, स्टेडियममध्ये जाऊन जागतिक दर्जाचे क्रिकेट पाहण्याची संधी मिळाली पाहिजे.”
टी-20 विश्वचषक 2026 ची तिकिटे कुठे, कधी खरेदी करायची?
टी-20 विश्वचषक 2026 ची तिकिटे https://tickets.cricketworldcup.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यातील तिकिटे भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6:45 वाजता विक्रीला सुरुवात झाली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.