त्या’ दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

T20 विश्वचषक IND vs ENG सेमी फायनल : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भार आणि इंग्लड यांच्यात  उपांत्य फेरीच्या सामन्याचा थरार रंगला. यामध्ये भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात इंग्लडचा युवा खेळाडू जेकब बेथेलने ऐतिहासिक शतक झळकावले. परंतु इंग्लंडला  विजय मिळवता आला आहे. दरम्यान, टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.

संपूर्ण सामन्यात एकूण 499 धावा झाल्या

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 253 ५३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने कडवी झुंज देत 246 धावा केल्या. हा सामना फक्त 7 धावांनी गमावला. संपूर्ण सामन्यात एकूण 499 धावा झाल्या.

दोन षटकांनी सामन्याचा निकाल फिरवला

254 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 17 षटकांत 209 धावा केल्या. त्यांना शेवटच्या तीन षटकांत 45 धावा करायच्या होत्या. जेकब बेथेल आणि सॅम करन यांच्यात खेळ सुरू होता आणि इंग्लंडचा विजय पूर्णपणे शक्य वाटत होता. दरम्यान, 18 व्या षटकात, जसप्रीत बुमराह त्याच्या शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने फक्त सहा धावा दिल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळला. सर्वांच्या नजरा आता हार्दिक पंड्यावर होत्या. हार्दिक 19 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला आणि बेथेलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. इंग्लंड पुनरागमनासाठी सज्ज दिसत होता, परंतु हार्दिकने तिसऱ्या चेंडूवर सॅम करनला बाद केले. इंग्लंडला आता नऊ चेंडूत 32 धावा हव्या होत्या. हार्दिकने पुढील तीन चेंडूत फक्त दोन धावा दिल्या आणि या षटकात फक्त नऊ धावा मिळाल्या. बुमराह आणि हार्दिकच्या दोन षटकात फक्त 15 धावा देऊन इंग्लंड पूर्णपणे सामन्याबाहेर गेले. शिवम दुबेने उर्वरित कामगिरी केली, 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेकब बेथेलला 105 धावांवर बाद केले.

सॅमसन आणि बुमराह चमकले

संजू सॅमसनने 89 धावांची खेळी करत भारताच्या फलंदाजीचे नेतृत्व केले, तर शिवम दुबेने 43 आणि इशान किशनने 39 धावांचे योगदान दिले. दोघांनी मिळून भारताला 253 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. जसप्रीत बुमराहने चेंडूने सर्वात प्रभावी कामगिरी केली, त्याने चार षटकांमध्ये फक्त 33 धावा देऊन एक बळी घेतला.

महत्वाच्या बातम्या:

भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.