IND vs ENG : भारत की इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोण जिंकणार? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते?
भारत विरुद्ध इंग्लंड हेड टू हेड आकडेवारी: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरला आहे. भारतासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचं आव्हान असेल. भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर, टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 8 मार्चला गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कोण भक्कम स्थितीत आहे. हे यापूर्वीच्या आकडेवारीतून स्पष्ट होईल.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड 5 वेळा आमने सामने आले आहेत. तीनवेळा भारतानं विजय मिळवला तर दोन वेळा इंग्लंडवर विजय मिळवला. पाच पैकी 2 वेळा भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत आमने सामने आले. इंग्लंडनं 2022 मध्ये भारताला 10 विकेटनं पराभूत केलं. तर 2024 मध्ये भारतानं उपांत्य फेरीत इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केलं.त्या विजयासह भारतानं बदला पूर्ण केला होता.
T20 मध्ये हेड टू हेड
अंतर्राष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 29 वेळा आमने सामने आले आहेत. भारताने 17 वेळा विजय मिळवला तर इंग्लंडने 12 वेळा विजय मिळवला आहे. 2024 च्या सुरवातीपासून दोन्ही संघ 6 वेळा आमने सामने आले. भारताने 5 वेळा विजय मिळवला तर इंग्लंडला एकदा विजय मिळाला.
2026 टी20 वर्ल्ड कप मध्ये कामगिरी
2026 टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांची कामगिरी सारखीच राहिली आहे. दोन्ही संघानी 7- 7 सामने खेळले आहेत. यात दोन्ही संघांचा एकदा पराभव झाला आहे. भारत ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर होता. तर, इंग्लंड सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये पहिल्या स्थानावर होता. दोन्ही संघांची कामगिरी सारखीच दिसत असली तरी जुनी आकडेवारी भारताच्या बाजूने आहे.
भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
आणखी वाचा
Comments are closed.