तब्बू आणि दाक्षिणात्य सुपरस्टार 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार, फोटो शेअर करत दिली माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तब्बूने तिच्या आगामी चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी दिली आहे. या चित्रपटाद्वारे ती तीन दशकांनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन सोबत पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. दक्षिणेकडील सुपरस्टार नागार्जुनने त्याच्या १०० व्या तेलुगू चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे सध्याचे नाव ‘किंग १००’ आहे. बॉलिवूड अभिनेत्री तब्बू देखील या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. विशेष म्हणजे तब्बल तीन दशकांनंतर तब्बू आणि नागार्जुन पहिल्यांदाच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटींगला देखील सुरुवात झालेली आहे.

तब्बूने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून, ती नागार्जुन सोबत काम करत असल्याची आणि शूटिंगची माहिती जाहीर केली आहे. तब्बूने एक फोटो शेअर केला आहे, या फोटोत एका काळ्या खुर्चीवर चित्रपटाचे शीर्षक असलेला क्लॅपरबोर्ड ठेवलेला आहे. तिने त्याला कॅप्शन दिले, “आणि आम्ही किंग १०० सुरू करत आहोत.” तिने हॅशटॅगमध्ये नागार्जुनचे नाव देखील समाविष्ट केले आणि निर्मात्यांचा उल्लेख देखील केलेला आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बू आणि नागार्जुन ‘किंग १००’ या चित्रपटाद्वारे जवळपास ३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. यापूर्वी नागार्जुन आणि तब्बू १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘निन्ने पेल्लाडाटा’ या रोमँटिक चित्रपटात एकत्र दिसले होते. आता, तीन दशकांनंतर त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी पुन्हा एकदा प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. परंतु ‘किंग १००’ चे कलाकार आणि तंत्रज्ञ तसेच चित्रपटाच्या कथेबद्दल मात्र जाहीरपणे कुठलीही वाच्यता करण्यात आली नसून, याबाबतची अधिकची कोणतीही माहिती अजून देण्यात आली नाही.

तब्बूने अलीकडेच अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या ‘भूत बंगला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात काम केले होते. नागार्जुन शेवटचा रजनीकांतच्या ‘कुली’ या तमिळ ॲक्शन चित्रपटात दिसला होता.

Comments are closed.