मसूद अझहर अफगाणिस्तानात नाही, पाकिस्तानचा दावा फेटाळला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुख्यात दहशतवादी मसूद अझहर हा अफगाणिस्तानात असल्याचा पाकिस्तानचा दावा तालिबानने फेटाळला आहे. त्यामुळे जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा पाकिस्तानचा डाव उधळला गेला आहे. दहशतवादाला होत असलेला अर्थपुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्याने फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला होता. आता पुन्हा पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कारवाईचा आढावा घेतला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मसूद आमच्याकडे नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

Comments are closed.