विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, शपथविधीची तारीखही ठरली
थलपथी विजय तामिळनाडू सरकार : तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत सुरू असलेला सस्पेन्स आता संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत आहेत. तमिळगा वेत्री कळघमचे (TVK) प्रमुख विजय यांनी गुरुवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा विजय यांनी केला असून शपथविधीनंतर विधानसभा सभागृहात सहज बहुमत सिद्ध करू, असा विश्वासही त्यांनी राज्यपालांना दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची आणि आमदारांची माहिती राज्यपालांकडे सादर केली. सरकार स्थिर राहील आणि कोणतीही राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. विजय यांच्या दाव्यावर राज्यपाल समाधानी असल्याचं सांगितलं जात असून त्यानंतर त्यांना औपचारिकरित्या सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Tamil Nadu Government Formation : शपथविधी सोहळा लवकरच
राज्यपालांच्या या निर्णयानंतर तमिळनाडूतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथविधी शुक्रवार किंवा शनिवारी चेन्नईमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सोहळ्यासाठी TVK चे वरिष्ठ नेते, मित्रपक्षांचे प्रतिनिधी आणि देशभरातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रित केलं जाणार असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी बुधवारी विजय यांनी लोकभवन येथे राज्यपालांची भेट घेत TVK आणि काँग्रेसच्या आमदारांची यादी सादर केली होती. मात्र त्यावेळी राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे गुरुवारी होणारा संभाव्य शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.
VCK Support Decision : व्हीसीकेचा निर्णय अद्याप बाकी
दरम्यान, व्हीसीकेचे नेते थोल तिरुमावलवन यांनी TVK कडून पाठिंब्याची विनंती करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पक्षाची उच्चस्तरीय समिती लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला TVK कडून पत्र मिळालं आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. पक्षाच्या समितीत चर्चा करून समर्थन द्यायचं की नाही यावर निर्णय घेतला जाईल, असं तिरुमावलवन यांनी म्हटलं आहे.
तामिळनाडूतील पक्षीय बलाबल – एकूण 234
- TVK (विजय) – 108
- द्रमुक – 59
- AIADMK – 47
- काँग्रेस – 5
- पीएमके – 4
- मुस्लिम लीग – २
- कम्युनिस्ट पक्ष – २
- अंतिम फेरी – २
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – २
Vijay Political Rise : विजय यांच्या राजकीय प्रवासाकडे देशाचं लक्ष
चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून लोकप्रिय असलेले विजय आता तमिळनाडूच्या राजकारणात मोठा चेहरा बनले आहेत. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत TVK ला मिळालेल्या यशानंतर विजय मुख्यमंत्रिपदाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष तमिळनाडूकडे लागलं आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.