महंत आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वत: वर वार करुन घेतले, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
अहिल्यानगर : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी झाले आहेत. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात आदिनाथ महाराज यांना दाखल करण्यात आलं आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात आदिनाथ महाराज यांचा मोठा भक्त परिवार आहे. या घटनेमुळं त्यांच्या भक्त परिवारामध्ये खळबळ उडाली आहे.
महाराजांनी स्वत:वर वार केल्याची माहिती
आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वत:वर केल्याची माहिती समोर आली आहे. महाराजांनी स्वतःवरच वार कशामुळे केले याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. आदिनाथ महाराज शास्त्री यांना जखमी अवस्थेत अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आदिनाथ महाराज यांनी आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गडावरच सर्व भक्तांना खोलीच्या बाहेर ठेवलं आणि ते एकटे खोलीत गेले. यावेळी त्यांनी स्वतःवर वार करून घेतले, असल्याची माहिती समोर आली आहे.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्त परिवार अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे. आदिनाथ महाराज यांनी हे पाऊल उचलल्यानं त्यांच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली आहे.
खासगी रुग्णालयात उपचार सुरु
आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वत: वर वार करुन घेतल्याचं समोर आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी आदिनाथ महाराज यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणी सध्या प्राथमिक स्वरुपाची माहिती समोर आलेली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.