गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील पाच वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, चेअरमन एन.चंद्रशेखरन यांची घोषणा
मुंबई :टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी नववर्षानिमित्त टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. 2024 हे वर्ष अनपेक्षित असं राहिल्याचं त्यांनी म्हटलं. एन. चंद्रशेखरन यांनी नववर्षानिमित्त लिहिलेल्या पत्रात आगामी पाच वर्षात पाच लाख रोजगारांची निर्मिती करण्याबाबत विचार करत असल्याचं म्हटलं.
एन.चंद्रशेखरन यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात 2024 हे वर्ष अनपेक्षित राहिल्याचं म्हटलं, 2024 मध्ये जागतिक पातळीवर राजकीय अस्थिरतेचं राहिलं. यक्रेन, गाझा पट्टी, सुदानमध्ये लष्करी संघर्ष दिसून आला. पश्चिम आशिया, आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि बांगलादेशमधील जनआंदोलनामुळं निर्माण झालेल्या स्थितीचा उल्लेख देखील चंद्रशेखरन यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.
एन. चंद्रशेखरन यांनी त्यांच्या पत्रात टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांना आंदरांजली वाहिली. ते म्हणाले की रतन टाटा यांचं निधन आपल्या सर्वांसाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी मोठी हानी होती. ते दूरदर्शी व्यक्ती होते, त्यांनी एका पिढीच्या व्यवसायाला आकार दिला, असं चंद्रशेखरन म्हणाले. रतन टाटा यांचं निधन 9 ऑक्टोबरला वयाच्या 86 व्या वर्षी झालं.
एन. चंद्रशेखरन यांनी पुढील पाच वर्षात पाच लाख नोकऱ्यांची निर्मिती करण्याच्या टाटा ग्रुपच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. बॅटरी, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील उपकरणं यामध्ये नोकऱ्या कारखाने निर्मिती आणि योजनांमधील गुंतवणुकीतून निर्माण होणार आहेत. या पाच लाख नोकऱ्या सेवा क्षेत्रा व्यतिरिक्त असतील.
टाटा ग्रुप गुजरातच्या ढोलेरामध्ये एक सेमिकंडक्टर प्रकल्प आणि आसाममध्ये सेमींकडक्टर ओएसटी संयत्र निर्मितीचा प्रकल्प उभारणार असल्याचं एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलं. टाटा ग्रुपच्या रिटेल क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार सुरु आहे. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 2025 या वर्षाबाबत आशावादी असल्याचं देखील एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे.
टाटा ग्रुपच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार
टाटा ग्रुपच्या टाटा कॅपिटल या कंपनीचा आयपीओ 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. टाटा कॅपिटलचा आयपीओ 17 हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे. यापूर्वी टाटा टेक्नोलॉजीचा आयपीओ आला होता. या दशकात टाटा ग्रुपच्या कंपनीचा दुसरा आयपीओ येऊ शकतो. टाटा ग्रुपचा आणखी एक आयपीओ येणार हे कळताच टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली होती.
इतर बातम्या:
अधिक पाहा..
Comments are closed.